वाडा नगरपंचायतीचा निर्णय

वाडा : शहरातील मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पदपथाचा उपयोग वाहनचालक वाहनतळ म्हणून उपयोग करीत असल्याने या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते.  कोंडी टाळण्यासाठी शहरातील काही मोकळय़ा जागा वाहनतळासाठी आरक्षित करण्याचा निर्णय नुकताच वाडा नगर पंचायतीने घेतला आहे.

दुचाकी, चारचाकी तसेच अन्य प्रकारच्या वाहनधारकांकडून  ठरावीक भाडे (पे पार्किंग) आकारून खासगी जागा मालकांकडून शहरातील मध्यवर्ती असलेल्या काही जागा वाहनतळासाठी भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे. शहरात गणेश मैदान, ऐनशेत रोड, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, परळी नाका या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर जागा उपलब्ध आहेत. या जागा वाहनतळासाठी नगर पंचायतीने भाडेतत्त्वावर घेऊन शहरात होणारी वाहतूक कोंडी कमी करावी, अशी मागणी  नागरिकांकडून केली जात आहे.

शहरातील मुख्य रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच वाहनतळासाठी खासगी जागा भाडेतत्त्वावर आरक्षित करण्यात येतील.

डॉ. उद्धव कदम, वाडा तहसीलदार

यापूर्वी शाळेच्या परिसरात काही वाहनचालकांकडून विद्यार्थिनीशी छेडछाड करण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे पां.जा. हायस्कूलचे मैदान वाहनतळासाठी देण्यास  आम्हा पालकांचा तीव्र विरोध आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जयेश शेलार, पालक, वाडा