बालकामगारांची सुटका करण्याचे आव्हान

पालघर : एका शासकीय सर्वेक्षणादरम्यान पालघर जिल्ह्यत ३८ बाल कामगार आढळून आल्याचे समोर आले होते. ही शासकीय आकडेवारी असली तरी प्रत्यक्षात पालघर जिल्ह्यत मोठय़ा प्रमाणात बालकामगार विविध ठिकाणी काम करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या बालकामगारांची सुटका करण्याचे मोठे आव्हान जिल्हा कामगार विभागासमोर आह

जिल्ह्यमध्ये मोठय़ा प्रमाणात रोजगारासाठी स्थलांतर होत आहे. हे स्थलांतर होत असताना कुटुंबातील १४ वर्षांखालील मुले आपल्या कुटुंबासोबत शहराच्या ठिकाणी स्थलांतर करतात. हे स्थलांतरित ज्या ठिकाणी काम करीत आहेत, त्या ठिकाणी ही लहान मुलेही आपल्या पालकांच्या बरोबरीने काम करताना दिसतात. काही बांधकाम व्यावसायिकांकडे, काही वीटभट्टी स्तरावर तर काही मुले नाका कामगार म्हणून काम करत असल्याचे निदर्शनास येत आहे.  ही काम करणारी मुले प्रत्यक्षात वयाने लहान असली तरी शरीरयष्टी मोठय़ा मुलांप्रमाणे असल्याने ते लहान असल्याचे दिसून येत नाही. शिवाय कामाला घेताना त्यांच्याकडून वयाचा कोणताही पुरावा न घेताच त्यांना कामाला घेत असल्यामुळे ते बालमजूर असल्याचे ओळखून येत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लहान व मध्यम स्वरूपाच्या खानावळी, हॉटेलच्या स्वयंपाक घरात, टपऱ्या, महामार्गावरील काही धाबे यांच्या स्वयंपाकघरात, चहाची दुकाने, गाडी धुण्याची ठिकाणी आदी ठिकाणी ही मुले स्वत:ची गरज भागवण्यासाठी काम करीत असल्याचे दिसून येते. ही सर्व मुले शाळेत गेलेली नाहीत किंवा शाळेत गेली असली तरी त्यांनी शाळा कायमची सोडून या ठिकाणी ते काम करत आहे. अलीकडच्या काळात जिल्हा कामगार कार्यालयामार्फत अनेक ठिकाणी अशा बालमजुरांची सुटका करण्यात आली होती. ज्या आस्थापनांमध्ये हे बाल मजूर काम करीत होते, त्यांच्यावर कारवाईही करण्यात आले होते. त्यामुळे बालमजूर ठेवणारे यांचे धाबे दणाणले होते. मात्र करोना काळात कामगार विभागासमोर अपुरे मनुष्यबळासह विविध अडचणी निर्माण झाल्याने बालकामगार काम करीत असलेली ठिकाणे शोधणे अवघड होत आहे. त्यातच करोना काळात सर्वकाही बंद असल्याने गेल्या वर्षांंपासून कामगार विभागाच्या मोहिमा थंडावल्या आहेत.

तक्रारी प्राप्त झाल्या की ताबडतोब कारवाई केली जाते व बालकांची सुटका होते. कोरोनामुळे सध्या मोहिमा बंद होत्या. मात्र लवकरच काही अडचणी दूर झाल्यानंतर बालकामगार शोध मोहीम राबविली जाणार आहे.

किशोर दहिफळकर, सह कामगार आयुक्त, पालघर