scorecardresearch

महामार्गावरील त्रुटी ताततडीने दूर करणार; जिल्हाधिकारी स्तरावर महत्वपूर्ण बैठकीत निर्णय

उद्योगपती सायरस मिस्त्रीयांच्या अपघाती निधनानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले व रस्ता व सुरक्षितता विभागाच्या संदर्भात जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक पालघर येथे पार पडली.

महामार्गावरील त्रुटी ताततडीने दूर करणार; जिल्हाधिकारी स्तरावर महत्वपूर्ण बैठकीत निर्णय
(संग्रहीत छायाचित्र)

पालघर: मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा ताशी ८० किलोमीटर वेगमर्यादा असताना वाहनांच्या अति भरधाव वेगामुळे अपघात होत असल्याचे दिसून आल्यामुळे या महामार्गावर असणारम्य़ा अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या बाबत तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना दिल्या आहेत.

उद्योगपती सायरस मिस्त्रीयांच्या अपघाती निधनानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले व रस्ता व सुरक्षितता विभागाच्या संदर्भात जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक पालघर येथे पार पडली. या बैठकीला पोलीस अधीक्षक, परिवहन विभाग, महामार्ग सुरक्षा विभाग, जिल्हा परिषद तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालघर जिल्ह्यच्या मार्गावर फक्त नऊ अपघात प्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) असल्याचे महामार्ग प्राधिकरण अधिकारम्य़ांनी नमूद केले. तसेच या मार्गाची रचना व २०१३ नंतर झालेले रुंदीकरण पाहता ताशी ८० किलोमीटर वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.  त्याअनुषंगाने रस्ता दुभागल्यानंतर चारोटी जवळ देण्यात आलेले वळण व इतर (डिझाईन) रचना योग्य असल्याचा निर्वाळा यावेळी देण्यात आला.

महामार्गावरील सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अल्प तसेच दीर्घ कालावधीत करावयाच्या उपाययोजनांची आखणी करण्यात आली आहे.  आगामी काळात कालबद्ध कार्यRम आखण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.  महामार्गावर पडलेले खड्डे तातडीने भरण्यात यावेत असेही सुचित करण्यात आले. जिल्ह्यतील महामार्गाच्या पट्टय़ात असणाऱ्या सर्व अपघातप्रवण क्षेत्राची जिल्हाधिकारी यांच्या समवेत १४ सप्टेंबर रोजी संयुक्त पाहणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

रस्ते सुरक्षा विषयी  दीड महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीनंतर योजिलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी झाली नसल्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी आरोप केले. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तRार देणार असल्याचे सांगितले.

सुरक्षा लेखापरिक्षण नव्याने करणार

राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरुस्ती ही आयआरबी कंपनीकडे होती. मे २०२२ पासून या कंपनीचे ठेका संपला असल्याने आता नव्याने या महामार्गाचे सुरक्षा लेखापरिक्षण करण्यात येईल असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुरज कुमार सिंग यांनी सांगितले. तसेच महामार्गावर असणारे सर्व Rॅश बॅरिअर १.२ मिटर उंचीचे ठेवण्याबाबत सूचना देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

सर्वसामान्यांच्या मृत्यूचे मोल नाही

यापूर्वी झालेल्या रस्ता सुरक्षा बैठकीला अनेकदा वरिष्ठ अधिकारी गैरहजर राहून कनिष्ठ अधिकारम्य़ांना बैठकीला पाठवण्यात येत असत. मात्र सायरस मिस्त्रीयांच्या निधनानंतर या बैठकी ला गांभीर्याने घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे यापूर्वी शेकडोच्या संख्येत प्राण गमावलेल्या प्रवाशांचे प्रशासनाला मोल नव्हते का असा सवाल यानिमित्त उपस्थित राहिला आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या