पालघर: ६ व ७ मे या कालावधीमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे बागायत शेतीचे ७५२१ शेतकऱ्यांचे २७०० हेक्टरक्षेत्राचे नुकसान झालें असूनत्यांच्यबरोबरीने पुर्णतः नष्ट झालेली चार घरे व अंशतः नष्ट झालेली २१२० असे एकुण २१२४ घरांचे व चार झोपडयांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. नुकसान झाल्याने बाधितांना मदत देण्यासाठी एक कोटी २० लाख १५ हजार १९५ रुपये इतका निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून उपलब्ध करुन देण्यासाठीचा जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे.
६ व ७ मे या कालावधीमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे बागायत व शेतीचे १९२३ शेतकऱ्यांचे ५३७.६८ हेक्टरक्षेत्राचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. याच कालावधीत फळपिकांचे ५५९८ शेतकऱ्यांचे २१६२.७९ हेक्टरक्षेत्राचे ३३ टक्केपेक्षा जास्तपंचनामे तलाठी, ग्रामवसेवक व कृषिसहायक यांच्याद्वारे करण्यात आलेले असून बाधितांना मदत देण्यासाठी नऊ कोटी २३ लाख ७७ हजार आठशे रुपये इतका निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून उपलब्ध करुन देण्यासाठीचा शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
याच कालावधीमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे ९९ बोटींचे अंशतः नुकसान झाले असून दोन बोटींचे पुर्णतः असे एकुण १०१ बोटींचे नुकसान झालेने त्यांना मदत करण्यासाठी सहा लाख २४ हजार रुपये निधीची आवश्यकता आहे. या वादळी परिस्थितीत दोन बोटींचे जाळयांचे पुर्णतः नुकसान झाले असल्याने सदर शासन निर्णयानुसार आठ हजार रूपये इतक्या निधीची आवश्यकता असल्याने बाधितांना मदत करण्यासाठी सहा लाख ३२ हजार रुपये मात्र) इतका निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून उपलब्ध करुन देण्यासाठीचा शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबरीने सुक्या मासळीचे नुकसानी करीता मदत अदा करणेबाबत महसुल व वनविभाग शासन निर्णय क्रमांक: सीएएस-२०२२/प्र.क्र.३४९/म-९ दि.२७.०३.२०२३ मध्ये कोणतीही तरतुद नसल्याने विशेष बाब म्हणून मदत करण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री, मत्सव्यावसाय मंत्री तसेच मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडे आग्रही विनंती केलेली आहे.
या वादळी परिस्थिती आणि अवकाळी पावसामुळे घरे, झोपड्या, शेतीपिके ,फळपिके, बोटी व सुकी मासळी यांच्या नुकसान भरपाईसाठी शासनाकडून निधी प्राप्त होताच संबंधित तहसीलदार यांच्या मार्फत बाधितांना मदतीचे वाटप करण्यात येणार आहे असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. तसेच २३ मे रोजी पालघर जिल्ह्यात पुन्हा झालेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यांमुळे १०३० घरांचे अंशत: नुकसान झालेले असून त्यांचे पंचनामे करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.