पालघर :  जिल्ह्यातील स्त्री गुणोत्तराचे प्रमाणात समाधानकारक राहिले आहे. हे प्रमाण एक हजार पुरुषांमागे ९६९ स्त्रिया असे आहे.  लिंग निवड, गर्भधारणापूर्व, प्रसवपूर्व निदानतंत्राचा गैरवापर होत नसल्याने स्त्राी भ्रूण हत्यासारखे प्रकार जिल्ह्यात नगण्य आहेत. जिल्ह्याची आरोग्य व्यवस्थाही लिंग निवडीच्या प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष करत असल्यामुळे स्त्री गुणोत्तराचे प्रमाण समाधानकारक राहिले आहे. 

जिल्ह्यातील शासकीय, खासगी आरोग्य संस्था बरोबरीने इतर ठिकाणी जन्म-मृत्यूची होत असलेली नोंदणी यामधून स्त्राीिलग गुणोत्तराची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासन घेत असते.  सद्यस्थितीत पालघर जिल्ह्यात एक हजार पुरुषांच्या मागे ९६९ स्त्रिाया आहेत. गतवर्षी हे प्रमाण ९४७ स्त्रिया इतके होते. पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तसेच वसई-विरार या परिसरातून प्रसूतीसाठी इतर ठिकाणी गरोदर माता जात असल्यामुळे त्यांची नोंद जिल्ह्यात होत नाही.  बाळ जन्म झालेल्या परजिल्ह्यात केली जाते. त्यामुळे पर जिल्ह्यात झालेल्या जन्माची नोंद पालघर जिल्ह्यात होत नाही.  जिल्ह्यामध्ये डिसेंबपर्यंत सतरा हजारांपेक्षा जास्त मुली जन्माला आल्या असून १८ हजारांपेक्षा जास्त मुले जन्माला  आलेली आहे. करोना स्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक रुग्णालय उपचार केंद्रांमध्ये परावर्तित केल्यामुळे अनेक मातांना जिल्ह्याबाहेर व इतर ठिकाणी प्रसूतीसाठी जावे लागले. त्यामुळे गेल्या वर्षांची जन्माची आकडेवारी कमी दिसत आहे, असे प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहे.

भ्रूणहत्या किंवा लिंगनिदान करण्याची संस्कृती पालघर या आदिवासीबहुल जिल्ह्यात दिसून येत नाही. असेल ते अपत्य स्वीकारण्याची तयारी श्रीमंतांपासून दुर्बल घटकांपर्यंत दिसून येते. त्यामुळे लिंग गुणोत्तराच्या प्रमाणात स्त्रिायांची संख्या समाधानकारक आहे. कोणीही लिंगनिदान करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तातडीने तक्रार करणे आवश्यक आहे.  -डॉ.दयानंद सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी,जि.प.पालघर

आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान करणे हे पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा असुन असे कृत्य होताना आढळल्यास १८००-२३३ -४४७५ या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा http://www.amchimulgi.com या संकेतस्थळावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्यांच्या नावाबाबत गुप्तता पाळण्यात येऊन महितीदाराला एक लाख रुपयेपर्यंत बक्षीस देण्यात येणार आहे.