कासा :  पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठे सूर्या धरण उशाला असूनही,  पाण्यासाठी आदिवासी महिलांची वणवण सुरू होते. आता ही वणवण संपणार आहे. विक्रमगड तालुक्यातील ५९ गावांना जलजीवन मिशन योजना मंजूर झाली असून   ग्रामस्थांना घरपोच नळाने शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे. दरवर्षी दिवाळी सणानंतर पाणीटंचाईचा सामना या गावांना करावा लागतो.  यावर मात करण्यासाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत बारमाही पाणी देण्याचे नियोजन तयार करण्यात आले आहे. 

विक्रमगड तालुक्यामध्ये  ५९ गावांना पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या आहेत.   यामध्ये केगवा,  कासा बुद्रुक, उपराळे,  आंबेघर तर्फे धरमपूर, बांगरचोळ, बोरांडे शील, बोराडे, चापकी तलावली, दादडे देवपूर, इंदगाव, कऱ्हे, कशिवली, कावळे, कवडास, कोंडगाव, म्हसरोली, मोहो बुद्रुक, नागझरी, सजन झडपोली, सावरोली, सावराई, शेलपाडा, शीळ, तलवाडा, वेढे बुद्रुक, वीळशेत, विठ्ठल नगर, भोपोली ,वेहलपाडा, सवादे, सातखोर, माडाचा पाडा, कुंज, देहरजे, चरणवाडी, सारशी ,डोलारी खुर्द, घाणेकर, क्रुंझे ,शिळशेत ,वडपोली, मेढी, वसूरी ,चंद्रनगर खांडेघर ,खांड, बालापुर ,खडकी, हातणे, दादडे अनंतपुर, चिंचघर, ब्राह्मणगाव ,बास्ते, आपटी, या गावांचा समावेश आहे.

Struggle of women in Borpada village of Trimbakeshwar taluka for water
कशासाठी ? हंडाभर पाण्यासाठी…
Engineer bribe Dhule district
धुळे जिल्ह्यात ग्रामसेविकेसह अभियंता लाच स्वीकारताना जाळ्यात
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
nashik water crisis marathi news,
नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर

 येत्या काही दिवसांमध्ये या योजना सुरू होणार आहेत जलजीवन मिशन अंतर्गत प्रतिव्यक्ती ५५ लिटर पाणी मिळावे यासाठी नियोजन केले आहे. बाराही महिने ग्रामस्थांना मुबलक पाणी मिळण्यासाठी हे नियोजन असणार आहे.  या योजनेमुळे ग्रामस्थांची पाणीटंचाईतून मुक्तता होणार आहे. या पाणीपुरवठा योजनांमुळे अनेक गाव व पाढय़ा वस्त्यावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणार आहे विक्रमगड तालुक्यामध्ये ८१ गावांसाठी  योजना प्रस्तावित केली आहे. त्यापैकी ५९ गावांना ही योजना मंजूर झाली आहे.  त्यापैकी सात ते आठ गावांतील योजनेच्या कामांना सुरुवात झाली आहे. भविष्याचा विचार करून उपाय योजना करण्यात आल्या आहेत प्रत्येक गावात नळ जोडणीसह वाढीव जलकुंभ देखील उभारले जाणार आहे. या योजना या योजना लवकरात लवकर व चांगल्या पद्धतीने कशा पूर्ण होतील याकडे पाणीपुरवठा विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

जलस्रोतांची निर्मिती

जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी गाव परिसरात उपलब्ध असलेल्या नदी, तलाव किंवा विहिरीमधून पाणी घेतले जाणार आहे. ज्या ठिकाणी पाण्याचे स्रोत उपलब्ध नसतील त्या ठिकाणी नवीन विहिरीचे खोदकाम करून जलस्रोत तयार करण्यात येणार आहेत.