पालघर: अक्षर ओळख, लेखनवाचन, गणिती संकल्पना, गट खेळ, अभिनयगीत यांसारख्या कृतींमधून बालकांचा सर्वांगीण विकास साधण्याकरिता जव्हार आणि मोखाडा तालुक्यांतील मॉडेल अंगणवाडी सेविकांनी ‘पालवी’ प्रकल्पाच्या सहाव्या स्तराचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रशिक्षक म्हणून आपली जबाबदारी स्वीकारली आहे.

‘पालवी’ हा उपक्रम क्वेस्ट संस्थेने रोटरी क्लबच्या आर्थिक साहाय्याने, महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा परिषद पालघर यांच्या सहकार्याने २०२४ मध्ये सुरू केला. २५ व २६ जून २०२५ रोजी मोखाडा येथे हे निवासी प्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षणात क्वेस्ट संस्थेचे कल्पेश पाटील आणि पालिका मोरे यांनी सेविकांना प्रत्यक्ष शैक्षणिक कृतींच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

जव्हार व मोखाडा तालुक्यांतील सर्व मॉडेल अंगणवाडी सेविका व सुपरवायझर यांनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदवला. प्रशिक्षणानंतर सेविकांनी आपल्या बीटमधील इतर अंगणवाड्यांमध्येही हे ज्ञान पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. अंगणवाडी सेविकांना प्रमाणपत्रांचे वाटप जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) व्यंकटराव हुंडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी अक्षय पगार, प्रकल्प अधिकारी संदेश दुमाड, जागृती किरकिरे, कल्पना भोये, अमोल पाटील, जनसंपर्क अधिकारी श्रद्धा घरत आणि प्रकल्प व्यवस्थापक तुषार मराडे उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंगणवाड्यांची स्थिती बदलत आहे. मिळालेली मदत योग्य वेळी लाभली असून, हे संचित सेविका निश्चितच पुढे नेतिल.” असे प्रतिपादन जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्ही.एम. हुंडेकर यांनी केले. माझी अंगणवाडी १ ते ६ या पुस्तिकांचा संच दागिन्यांसारखा जपून ठेवा, जेणेकरून पुढच्या सेविकांनाही त्याचा उपयोग होईल. पालवीचे काम महाराष्ट्रात आणि पुढे देशभर व्हावे, हीच माझी प्रार्थना आहे असे मोखाडा गटविकास अधिकारी अक्षय पगार यांनी सांगितले.