पालघर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वे संबंधित विविध उपक्रमांचा पायाभरणी तसेच लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असताना स्थानिक पातळीवर उद्घाटन कार्यक्रम दृकश्राव्य पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. अशा कार्यक्रमाच्या आयोजनात दरम्यान रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेची तळजोड केल्याचे पालघर येथे दिसून आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत रेल्वे मंत्रालया अंतर्गत अनेक उपक्रमांचे पायाभरणीचे कार्यक्रम १० वंदे भारत व चार विस्तारित वंदे भारत सेवांसह इतर नवीन सेवांचा शुभारंभ तसेच अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचा राष्ट्राला समर्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

educated unemployed flex modi rally
मोदींच्या सभास्थळी सुशिक्षित बेरोजगाराने लावले फ्लेक्स; म्हणाला, “युवकांचा आक्रोश तुम्हाला…”
Kolhapur, Kolhapur lok sabha,
उद्योजक ते कलाकार… कोल्हापुरात सारेच प्रचारात
3334 children underwent heart surgery under the National Child Health Programme
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…
political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी

हेही वाचा : शहरबात : जिल्ह्यातील मनोरुग्णांची बिकट अवस्था

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पालघर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ येथील “एक स्थानक एक उत्पादन” स्टॉलचे देखील लोकार्पण करण्यात आले. यानिमित्ताने पालघर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ व त्यानिमित्ताने कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांसाठी आसनाची व्यवस्था केली होती. ही व्यवस्था रेल्वे फलाटापासून अवघ्या काही फुटांपर्यंत विस्तारित असल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली होती.

हा कार्यक्रम आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरू करण्यात येणार होता. मात्र प्रत्यक्षात कार्यक्रम विलंबाने सुरू झाला. दरम्यान मुंबई कडून गुजरात कडे या मार्गावरून अनेक जलद गाड्या तसेच पालघरला थांबणाऱ्या गाड्यां गेल्या पालघर येथे थांबणाऱ्या गाड्या व उपनगरीय गाड्यांमधून फलाटा वर उतरताना गर्दीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच त्या प्रसंगी चेंगराचेंगरी होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे पंतप्रधान यांच्या कार्यक्रमाच्या आयोजना दरम्यान रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेबरोबर खेळ केल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा : ‘पालघर नवनगर’ स्वप्न अपूर्णच; आठ वर्षांपासून ३३७ हेक्टर क्षेत्रफळापैकी एकही भूखंड सिडकोकडून विकसित नाही

दरम्यान या कार्यक्रमाच्या निमित्ताने रेल्वे फलटाजवळ नागरिकांनी येऊ नये म्हणून रेल्वे पोलीस दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती स्थानीय रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. पालघर रेल्वे स्थानकात एक उत्पादन एक स्टॉल ज्या ठिकाणी उभारण्यात आले आहे त्या अनुषंगाने उद्घाटन कार्यक्रमाची जागा निश्चित करण्यात आल्याची सबब रेल्वे प्रशासन देत होते.