कासा: पालघर जिल्ह्यातील आदिवासीबहुल मोखाडा तालुक्यातील तुल्याचा पाडा मोर्हंडा गावातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीच्या पलिकडे जाऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत उन्हाळी भुईमूग लागवडीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. भुईमूग पिकाच्या पर्यायाने या भागातील शेतकऱ्यांचे स्थलांतर थांबले असून, आर्थिकदृष्ट्या ते अधिक स्वयंपूर्ण झाले आहेत.

जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा आहे.या जिल्ह्यात सरासरी २५००  मिमी. पाऊस पडत असल्याने शेती प्रामुख्याने खरीप  हंगामातच केली जाते. त्यात पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुका हा अतिशय दुर्गम आणि पूर्णता आदिवासी लोकवस्ती असलेला आहे. मोखाडा तालुक्यातील भोयेपाडा, तुळयाचापाडा मोर्हंडा हे गाव अतिशय दुर्गम  आणि जंगलाने वेडलेले आहे. पालघर पासून अंदाजे ११० किलोमीटर अंतरावर वसलेले हे गाव. प्रगतीशील शेतीसाठी प्रतिकूलता अशी इथली स्थिती .घरच्या गरीब परिस्थिमुळे  बहुसंख्य शेतकरी  खरीपात भात, नागली, खुरासणी इ. पिके घेतात.

 गावाच्या जवळच एक धरण आहे. खरीप  हंगामात पावसाच्या पाण्यावर भात, नागली ,वरई,उडीद इत्यादी पिके घेतली जातात.त्यानंतर रोजगार मिळवण्यासाठी बहुसंख्य तरुण मुंबई,नाशिक येथे जातात. खरीपानंतर १०-१५ गुंठे  मिरची पिकाची लागवड जवळच असलेल्या धरणाच्या पाण्यावर करत आणि बाकीचे सर्व क्षेत्र ओसाड असे. त्यातच भर म्हणून मिरची पिकाचे  भावातील चढउतारामुळे मिरची पिक परवडत नसे.

कृषि विज्ञान केंद्राकडून मार्गदर्शन

 सन २०१४ मध्ये कृषि विज्ञान केंद्र, पालघर यांनी  भोयेपाडा तुळ्याचापाडा (मोर्हंडा) ता.मोखाडा गावाचा सर्वे करून गावातील शेती संबंधित प्रमुख समस्या जाणून घेतल्या.त्यानुसार भात, नागली,खुरासणी व परसबाग ,कोबडीपालन इत्यादी प्रात्याशिके  राबवली. या गावातील आदिवासी शेतकऱ्यांकडे भांडवलाची असलेली कमतरता,बाजाराचा अभाव,लागवड पद्धतीची माहिती नसणे.परंतु या गावातील शेतकऱ्यांची शेती करण्याची जिद्द व मेहनत बघून कृषि विज्ञान केंद्राचे शाश्रज्ञ भरत कुशारे यांनी भात  पिकानंतर भुईमूग पिकाचा पर्यायी पीक म्हणून घेण्याचा मार्ग दाखविला. शेतकऱ्यांना एकत्र करून भुईमूग लागवडीचे इक्रीसॅट तंत्रज्ञानाचा प्रशिक्षण शाश्रज्ञ भरत कुशारे यांचेकडे घेऊन शेतकार्यानी  लागवडीस सुरुवात  केली.

मोखाडा तालुका दुर्गम, जंगलाने वेढलेला आणि संपूर्णतः आदिवासी वस्तीचा भाग आहे. इथल्या शेतकऱ्यांची शेती प्रामुख्याने खरीप हंगामापुरतीच मर्यादित होती. मात्र, २०१४ साली कृषि विज्ञान केंद्र, पालघरने केलेल्या सर्वेक्षणात गावातील प्रमुख समस्या आणि शेतीतील अडथळ्यांचा अभ्यास करून उपाययोजना सुचवण्यात आली.

शाश्रज्ञ भरत कुशारे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना भात नंतर भुईमूग लागवडीचे ‘इक्रीसॅट’ तंत्रज्ञान शिकवण्यात आले. पहिल्या वर्षी (२०१५-१६) फक्त ५-६ एकरवर लागवड झाली, पण उत्पादन चांगले आल्यामुळे हळूहळू क्षेत्र वाढत गेले. आज, २५० एकरांवर उन्हाळी भुईमूग घेतले जाते.

इक्रीसॅट तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर

या तंत्रज्ञानामध्ये रुंद सरी-वरंबा पद्धती, ड्रीप सिंचन, संतुलित खत व्यवस्थापन आणि उत्पादनक्षम जातींचा वापर केला जातो. परिणामी, शेंगांचे भरगच्च उत्पादन होते, पाण्याची बचत होते आणि जमीन सुपीक बनते. भुईमूगाचा पाला जनावरांसाठी चारा म्हणून वापरला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ११०-११५ दिवसांच्या उन्हाळी हंगामात स्थानिकांना रोजगार मिळतो, त्यामुळे शहरी स्थलांतर मोठ्या प्रमाणात थांबले आहे.

शेतीतून स्वप्नपूर्ती

या यशस्वी प्रयोगाबाबत बोलताना शेतकरी पांडुरंग चौधरी सांगतात, “भुईमूग लागवडीमुळे फक्त पैसा नाही तर आमचे स्थलांतर थांबले. घरासाठी तेलाचा प्रश्न सुटला आणि भुईमूगाच्या उत्पन्नाने मी माझे स्वप्नातील पक्के घर उभारू शकलो.”

स्थिर विक्री व्यवस्थाही तयार

उत्पन्नाच्या दृष्टीने, सरासरी ९ ते १० क्विंटल प्रती एकर उत्पादन मिळते. काही शेतकऱ्यांना तर १४ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. शेंगांच्या विक्रीसाठी नाशिक, मुंबई, त्र्यंबकेश्वरसह पुण्याच्या सिद्धार्थ कंपनीकडे वाळलेल्या शेंगांची विक्री होते.

उन्हाळी भुईमूग लागवडीचा हा प्रयोग आदिवासी शेतकऱ्यांच्या आयुष्यातील सकारात्मक बदल घडवणारा ठरला असून, आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणारा आदर्श नमुना म्हणून पुढे येत आहे.

टी.ए.जी.२४ , टी.जी.३८ व टी.जी ३९,फुले भारती ,फुले उन्नती आणि टी.ए.जी.७३  या उपट्या प्रकारातील जाती लागवडीसाठी  घेतल्या.

खत व पाणी व्यवस्थापन:

एकरी १० किलो नत्र आणि २० किलो स्पुरद पेरणीच्या वेळी २२ किलो  युरिया आणि १२५ किलो सिंगल सुपर फास्फेटच्या माध्यामातून दिले.शेणखत दिल्यामुळे सुश्म अन्नद्रव्याची आवश्यकता भासली नाही.भुईमुगास  उन्हाळी हंगामात ०८ ते १०  दिवसाच्या अंतराने १२  वेळेस ड्रीप सिंचनाने पाणी दिले. 

ड्रीप पद्धतीने पाणी दिल्याने पाण्याची बचत झाली आणि उत्पादन सुद्धा वाढले.विशेषतः फांद्या फुटण्याची अवस्था,आऱ्या उतरण्याची अवस्था आणि शेंगा भरण्याची अवस्था या वेळेस पाणी देण्याची विशेष काळजी घेतली.

 उत्पादन

 इक्रीसॅट तंत्रज्ञान(रुंद वरंबा आणि सरी पद्धत)-टी.जी.३८ व टी.जी ३९ या सरासरी उत्पादन नऊ – १०  किं./ एकर वाळलेल्या शेंगाचे मिळाले.काही शेतकाऱ्याना उत्पादन १४ किं./एकरइतके सुद्धा उत्पादन मिळाले. उपट्या प्रकारातील जाती घेतल्या. सरासरी ५५  रुपये प्रती किलो दर वाळलेल्या शेंगासाठी आणि ४५  रुपये दर ओल्या  शेंगासाठी मिळाला.

दि. ९ या कार्यक्रम एकूण २३ शेतकरी उपस्थित होते त्यात आदिवासी शेतकरी महिलांची उपस्थिती जास्त होती,

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भात-पश्चात भुईमूग हे पर्यायी नगदी पीक घेतल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. ही पद्धत इतर आदिवासी भागातही लागू केली जाऊ शकते.- भरत कुशारे, कृषी विज्ञान केंद्र शास्त्रज्ञ