बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका कारखानामधील दहा कामगारांना वायुबाधा झाल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. वायुबाधा झालेल्या कामगारांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचे प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यानी दिली.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कॅमलिन फाईन सायन्स या रासायनिक कारखान्यात रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास डायमिथेन सल्फेट या वायूची अचानक गळती झाली. त्यावेळेस कामावर उपस्थित कामगारांना कोणताही त्रास झाला नाही. मात्र सकाळी कामावरून घरी गेल्यानंतर दहा कामगारांना डोळे चुरचुरणे आणि जळजळ सारखा त्रास सुरू झाल्याच्या तक्रारी आल्याने कंपनी व्यवस्थापनाने बाधा झालेल्या आशिष दशरथ देशमुख (३१),नरेंद्र ठाकूर (३३),अभिषेक देव (२८), मंगल यादव (४७)मनीष यादव (२०),विजयपाल (२२),जितेंद्र चौधरी (३६), सुनील पाटील (२९), केतन म्हात्रे (२९),अबू बकर (३०) आणिमनीष कुमार (२९) या दहा कामगारांना बोईसर मधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचारासाठी दाखल केलेल्या सर्व कामगारांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी दिली.

वायुगळती प्रकरणी बोईसर पोलीस आणि औद्योगिक व आरोग्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी कारखान्यात वायुगळती झालेल्या ठिकाणाची पाहणी व बाधित कामगार यांची भेट घेऊन तपास सुरू केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहाटे तीन वाजेच्या सुमारास डायमिथेन सल्फेट या वायूची गळती झाली. कामावर उपस्थित कामगारांना सुरुवातीला कोणताही त्रास झाला नाही मात्र घरी गेल्यानंतर सकाळी त्रास होऊ लागल्याने दहा कामगारांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी बोईसर पोलीस स्टेशन आणि औद्योगिक व आरोग्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना त्वरित माहिती दिली. धवल राऊत, व्यवस्थापक कॅम्लीन फाईन सायन्स