पालघर : पालघर मधील माहीम गावात स्टेट बँकेच्या एटीएमवर चोरट्यांनी धाडसी हल्ला केला आहे. रात्री ३ च्या दरम्यान ही घटना घडली असून चोरट्यांनी एटीएममधून लाखो रुपयांची रोकड चोरून नेली.
चोरी केल्यानंतर आपली ओळख आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी एटीएमला आग लावली. या घटनेत तीन ते चार चोरटे एका चारचाकी गाडीतून आले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही चोरी माहीम बाजारपेठेतील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये झाली असून चोरीनंतर चोरटे पसार झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
