लोकसत्ता प्रतिनिधी
बोईसर: बोईसर शहरात रविवार रात्रीपासून २४ तासात चाकू- कोयत्याने हल्ला करण्या च्या तीन घटना घडल्या असून या प्रकरणात तीन नागरिक जखमी झाले आहेत. बोईसर मधील कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाला असून नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बोईसर शहरातील भैयापाडा आणि यशवंत सृष्टी भागातील रेहान शेख आणि संजीत मिश्रा या दोन तरुणांवर रविवारी रात्री १०.३० नंतर १५ ते २० जणांच्या टोळक्याने त्यांना घेराव घालून मारहाण करण्यास सुरुवात केली होती. टोळक्याने रेहानच्या डोक्यात लोखंडी रॉड आणि संजीत क्रिकेटची बॅटच्या बेदम मारहाण केल्यानंतर चाकूने वार करून जखमी करण्यात आले. या हल्ल्यात दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आणखी वाचा-मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन
रविवार च्या दिवशी घडलेल्या मारहाण प्रकरणी बोईसर पोलीसांनी किरकोळ कलमे लावून गुन्हा दाखल केल्याने पोलिसांवर टीकेची झोड उठविण्यात येत असताना सोमवारी रात्रीच्या ९ वाजल्याच्या सुमारास प्रवीण पुरोहित याने आठ महिन्यापूर्वी त्याच्या नातेवाईक सोबत झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी बोईसर परिसरातील गजबजलेल्या ओसवाल या ठिकाणी शम्बु भाजीवाला यांच्या मुलावर कोत्याने वार करून हल्लेखोर फरार झाला. या घटनेचे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर बोईसर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात दाखल गुन्ह्यात भारतीय दंड संहितेचे कलम ३०७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी प्रवीण पुरोहित व कारचालक आकाश सिंग याला बोईसर पोलिसांनी रात्री अटक केले आहे.
मारहाणीच्या घटनेमुळे बोईसर मध्ये दहशतीच वातावरण निर्माण झाले. दहशत माजवणाऱ्या टोळक्यांचा उन्माद वाढल्याने बोईसर शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अपयशी ठरले असल्याचे दिसून येत आहे.