कासा : मुंबईकडून गुजरातकडे जात असलेल्या गाडीला पालघर तालुक्यातील सोमटा गावच्या जवळ आग लागली. गाडीमधील प्रवाशांनी प्रसंगावधान दाखविल्याने प्रवासी सुखरूप बाहेर पडले. दोन महिला व दोन पुरुष प्रवास करणाऱ्या आपल्या गाडीला आग लागल्याचे लक्षात येताच या प्रवाशांनी गाडीतून खाली उतरून घेतले.

आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी मुंबईला आले होते. परतीच्या प्रवासादरम्यान ७३० वाजल्यानंतर गुजरातकडे जाताना ही घटना घडली. सर्वांनी प्रसंगावधान दाखवत गाडीतून उतरल्याने अनर्थ टळला. महामार्गावरच गाडीने आग पकडल्याने महामार्गावरील वाहतूक एक तास विस्कळीत झाली होती. महामार्गाचे काँक्रीटीकरण सुरू असल्याने पाण्याचे टँकर जवळच होते. त्यामुळे टँकरच्या पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्यात यश आले नाही. त्यामुळे या आगीमध्ये गाडी पूर्णपणे जळून खाक झाली.

हेही वाचा – बोरिवली-विरार दरम्यानच्या नव्या रेल्वे मार्गिकेसाठी भूसंपादन, ५ गावे बाधित होणार, ग्रामस्थांचा आंदोलनाचा पवित्रा

हेही वाचा – जिल्ह्यातील मनोरुग्णांची माहिती संकलित करून आढावा घेणार, पोलीस अधीक्षक यांची माहिती

महामार्गाचे काँक्रीटीकरण सुरू असल्याने अगोदरच वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच हा अपघात झाल्याने वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.