-
‘पावनखिंड’ हा चित्रपट १८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला.
-
लेखक – दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी संकल्पित केलेल्या आठ चित्रपटांपैंकी हा तिसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा ‘पावनखिंड’ हा भव्य-दिव्य आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे.
-
पावनखिंड या घटनेचा कसून अभ्यास, त्या लढाईची नाट्यमयता, महारांजावर जीव ओवाळून टाकणारे वीर शिलेदार मावळे आणि त्यांची यशोगाथा सांगणारा ‘पावनखिंड’ हा चित्रपट.
-
शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने या चित्रपटात मांडली आहे.
-
पूर्वी घोडखिंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देत गनिमांची वाट रोखून धरत पराक्रमाची शर्थ केली होती.
-
बाजीप्रभूंच्या पवित्र रक्ताने पावन झाल्याने या खिंडीला पुढे ‘पावनखिंड’ नाव पडलं.
-
हा चित्रपट प्रेक्षकांना भावला असून तिकीटबारीवर याची जोरदार कमाई सुरु आहे.
-
पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने १० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
-
पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचं कलेक्शन १.१५ कोटी रुपये एवढं होतं.
-
शनिवारी २.०५ कोटी रुपये व रविवारी ३ कोटी रुपयांचा गल्ला या चित्रपटाने जमवला.
-
संपूर्ण महाराष्ट्रात या चित्रपटाला १९१० स्क्रिन मिळाल्या.
-
मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी, चिन्मय मांडलेकर, अंकित मोहन, क्षिती जोग, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, शिवराज वायचळ यांसारख्या मातब्बर कलाकारांनी ‘पावनखिंड’मध्ये भूमिका साकारल्या आहेत.
-
सध्या सगळीकडेच हा चित्रपट चर्चेत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case