
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आणि लोकप्रिय अभिनेत्री जिनिलिया देशमुख चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असते.

नुकतंच जिनिलियाने फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

फोटोमध्ये जिनिलियाने शरारा ड्रेस परिधान करत देसी लूक केला आहे.

साजेसा मेकअप आणि ज्वेलरीमध्ये जिनिलियाचं सौंदर्य खुलून दिसत आहे.

जिनिलियाचं देसी लूकमधील फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. (सर्व फोटो : जिनिलिया देशमुख/ इन्स्टाग्राम)