-
लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीने अभिनय कौशल्याने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
-
प्राजक्ताचा चाहता वर्गही मोठा आहे. सोशल मीडियावरून प्राजक्ता चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
नुकतंच प्राजक्ताने साडीत हटके फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोशूटसाठी प्राजक्ताने नो ब्लाऊज साडी लूक केला आहे.
-
या नवीन लूकमध्ये प्राजक्ताचं सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.
-
प्राजक्ताच्या सौंदर्याने नेहमीच चाहते घायाळ होत असतात.
-
प्राजक्ताच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. काहींना प्राजक्ताचा हा ग्लॅमरस लूक आवडला आहे.
-
तर काहींनी ‘साडी नेसताना ब्लाऊज परिधान न करणं ही कसली फॅशन?’ अशा कमेंट्स करत प्राजक्ताला ट्रोल केलं आहे.
-
सध्या प्राजक्ता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. (सर्व फोटो : प्राजक्ता माळी/ इन्स्टाग्राम)

Operation Sindoor: भारतीय लष्कराची मोठी कारवाई; लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त!