
बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका कनिका कपूरचा विवाहसोहळ्यात अजय देवगणची लेक न्यासा देवगणचीच चर्चा रंगली.

न्यासाचा आजवरचा सगळ्यात बोल्ड लूक या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.

न्यासाने तिच्या मित्र-मंडळींबरोबर कनिकाच्या विवाहसोहळ्याला लंडनमध्ये हजेरी लावली होती.

न्यासाने बॉडी हगिंग गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

लंडन येथील विक्टोरिया अँड अब्लर्ट म्युझियममध्ये या विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

न्यासा या बोल्ड लूकमध्ये फारच ग्लॅमरस दिसत होती.

न्यासाचा मित्र ओरहानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत.

न्यासाच्या या लूकला नेटकऱ्यांकडून बरीच पसंती देखील मिळत आहे.

न्यासाच्या या फोटोंवर जान्हवी कपूरसह कलासृष्टीमधील अनेक मंडळींनी कमेंट्स केल्या आहेत. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)