
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक टीव्ही अभिनेत्री किंवा गायिका आहेत ज्यांना त्यांच्या पतींनी खूप महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. भेटवस्तूही इतक्या महाग आहेत की किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. (photo: pexels)

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेबद्दल सांगायचे तर तिचा पती विकी जैनने तिला मालदीवमध्ये 50 कोटींचा व्हिला गिफ्ट केला आहे.

शिल्पा शेट्टी अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांना तिच्या जोडीदाराकडून खूप महागड्या भेटवस्तू मिळाल्या आहेत. शिल्पा शेट्टीला पती राज कुंद्राकडून २० कॅरेटची डायमंड रिंग, बीएमडब्ल्यू कार आणि सीफेसिंग बंगला मिळाला आहे.

टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय हिला तिच्या पतीने म्हणजे सूरज नांबियार यांनी चार डायमंड अंगठ्या भेट दिल्या होत्या ज्यांची किंमत करोडो रुपये होती.

तेजस्वी प्रकाशला तिचा प्रियकर करण कुंद्राने एक पेंडेट आणि नेकलेस भेट दिला आहे आणि त्याची किंमतही खूप जास्त असल्याचे बोलले जात आहे.

राहुल वैद्य यांनी पत्नी दिशा परमार हिला हँडबॅग भेट दिली. या बॅगची किंमत दोन लाख रुपये आहे.

गायिका नेहा कक्करचा पती रोहनप्रीत सिंगने नेहाला दीड लाख रुपयांची बॅग भेट दिलीय.

बिग बॉस व्यतिरिक्त सना खान काही शो आणि चित्रपटांमध्ये दिसली आहे. तिच्या पतीने तिला लाखोंचा लेटेस्ट आयफोन गिफ्ट केला होता.

हे स्टार्स आपल्या पार्टनरला खुश ठेवण्यासाठी एकमेकांना भेटवस्तू देतात.(all photo: instagram)