-
‘कच्चा बदाम’ या गाण्यामुळे अल्पावधीतच लोकप्रिय झालेली अंजली अरोरा इंस्टाग्रामवर एकाहून एक रील्स बनवून चाहत्यांचे मनोरंजन करत असते.
-
तिची लोकप्रियता एवढी वाढली की टेलिव्हिजनवरील ‘लॉक अप’ या शोमध्ये तिला स्पर्धक म्हणून घेण्यात आलं.
-
आता ती खतरों के खिलाडीमध्ये दिसणार आहे. नुकतंच तिने याबद्दल खुलासा केला आहे.
-
तसेच या मुलाखतीमध्ये अंजली या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काय तयारी करत आहे याचा खुलासाही तिने केला.
-
‘इन्स्टंट बॉलिवूड’शी संवाद साधताना अंजली म्हणाली “मला पाली आणि सरड्यांची भीती वाटते, ज्यावर मी मात करायचा प्रयत्न करत आहे.”
-
याच मुलाखतीमध्ये अंजली अरोरा म्हणाली की ती आता ‘खतरों के खिलाडी सीझन १३’ साठी पूर्णपणे तयार आहे.
-
अंजलीचे चाहते ही बातमी ऐकून चांगलेच उत्सुक आहेत. कारण आता रील्सशिवाय अंजली वेगवेगळे स्टंट करताना दिसणार आहे.
-
अंजलीचे इंस्टाग्रामवर १२.५ मिलियन फॉलोअर्स आहेत.
-
फोटो सौजन्य : अंजली अरोरा / इन्स्टाग्राम
