-
अभिनेत्री पूजा सावंत लवकरच सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवणार आहे. ( फोटो सौजन्य : Prathmesh Rangole/ P16studios व पूजा सावंत इन्स्टाग्राम )
-
१६ फेब्रुवारीला पूजा व सिद्धेशचा पारंपरिक पद्धतीने, थाटामाटात साखरपुडा पार पडला. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. ( फोटो सौजन्य : Prathmesh Rangole/ P16studios व पूजा सावंत इन्स्टाग्राम )
-
पूजा व सिद्धेशने साखरपुड्यासाठी खास दोन लूक केले होते. विधींसाठी मराठमोळा लूक दोघांनी केला होता. तर अंगठी घालण्याच्या आणि इतर कार्यक्रमांसाठी वेस्टर्न लूक केला होता. ( फोटो सौजन्य : Prathmesh Rangole/ P16studios व पूजा सावंत इन्स्टाग्राम )
-
पूजाने नुकतेच साखरपुड्यातील वेस्टर्न लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत; जे क्षणार्धात व्हायरल झाले आहेत.( फोटो सौजन्य : Prathmesh Rangole/ P16studios व पूजा सावंत इन्स्टाग्राम )
-
“आम्ही एकमेकांच्या साथीने नव्या प्रवासाची सुरुवात करण्यास उत्सुक आहे”, असं सुंदर कॅप्शन लिहित पूजाने साखरपुड्यातील वेस्टर्न लूकचे फोटो शेअर केले आहेत. ( फोटो सौजन्य : Prathmesh Rangole/ P16studios व पूजा सावंत इन्स्टाग्राम )
-
पांढऱ्या रंगाच्या थीमनुसार पूजाने संपूर्ण पांढरा लेहेंगा आणि सिद्धेशने होणाऱ्या बायकोला मॅचिंग अशी पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. ( फोटो सौजन्य : Prathmesh Rangole/ P16studios व पूजा सावंत इन्स्टाग्राम )
-
पांढऱ्या रंगाच्या पेहराव्यात पूजा व सिद्धेश खूपच सुंदर दिसत होते. ( फोटो सौजन्य : Prathmesh Rangole/ P16studios व पूजा सावंत इन्स्टाग्राम )
-
अभिनेत्रीच्या अंगठीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. होणाऱ्या नवऱ्याने पूजाला हिऱ्याची अंगठी घातली आहे. ( फोटो सौजन्य : Prathmesh Rangole/ P16studios व पूजा सावंत इन्स्टाग्राम)
-
पूजाच्या साखरपुड्यात आकर्षक भलामोठा केक पाहायला मिळाला. (फोटो सौजन्य : Prathmesh Rangole/ P16studios व पूजा सावंत इन्स्टाग्राम)
-
“आम्ही बंधनात अडकलो”, असं या भलामोठ्या केकवरती लिहिण्यात आलं होतं. (फोटो सौजन्य : Prathmesh Rangole/ P16studios व पूजा सावंत इन्स्टाग्राम)
-
मोजक्या पाहुण्यांच्या व जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या उपस्थित पूजाचा साखरपुडा पार पडला. ( फोटो सौजन्य : Prathmesh Rangole/ P16studios व पूजा सावंत इन्स्टाग्राम )
-
पूजाच्या साखरपुड्याला प्रार्थना बेहेरे, भूषण कडू, गश्मीर महाजनी, वैभव तत्ववादी असे बरेच कलाकार मंडळी उपस्थित होती. ( फोटो सौजन्य : Prathmesh Rangole/ P16studios व पूजा सावंत इन्स्टाग्राम )

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात