-
तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके यांचा लग्नसोहळा गेल्या महिन्यात २६ तारखेला थाटामाटात पार पडला.
-
मराठी सिनेविश्वातील बऱ्याच कलाकारांनी तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नाला खास उपस्थिती लावली होती.
-
लग्न झाल्यावर तितीक्षाचं सासरी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
-
याचा खास व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
-
तितीक्षा-सिद्धार्थने शेअर केलेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे.
-
गृहप्रवेश होण्यापूर्वी हे नवविवाहित जोडपं लग्नाच्या वरातीत एकत्र थिरकत असल्याचं पाहायला मिळालं.
-
याशिवाय तितीक्षाने सासरी गृहप्रवेश करताना नवऱ्यासाठी एक हटके उखाणा देखील घेतला.
-
तितीक्षाच्या सासूबाई या व्हिडीओमध्ये म्हणतात, “माझी सून आज माझ्या घरात आलीये त्यामुळे हा दिवस माझ्यासाठी खूप खास असून मी प्रचंड आनंदी आहे.”
-
दरम्यान, दोघांनीही लग्नानंतर ब्रेक न घेता पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. ( सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा तावडे युट्यूब व्हिडीओ )

याला म्हणतात ठसका! हळदीत नंदेसमोर वहिणीनं केला जबरदस्त डान्स; VIDEO ची संपूर्ण सोशल मीडियावर चर्चा