-    ‘बिग बॉस’च्या घरात यंदा ‘गुलीगत धोका’ फेम रीलस्टार सूरज चव्हाणने प्रवेश घेतला आहे. 
-    सूरजचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. 
-    सध्या त्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रोत्साहन मिळत आहे. 
-    ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्याच आठवड्यात सूरजने वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं होतं. 
-    सुरुवातीच्या काळात मोठा संघर्ष करून सूरज चव्हाणने आज सोशल मीडियावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 
-    ‘बिग बॉस’मध्ये सूरजने स्वत:ची सध्याची कमाई सांगितली आहे. 
-    सूरज सांगतो, “मला आधी दिवसाला ८० हजार मिळायचे…तेव्हा टिकटॉक होतं.” 
-    “आताही मला दिवसाला ३० ते ५० हजार मिळतात. बच्चा बच्चा जानता है ‘गुलीगत धोका’ बोलणारा सूरज कोण आहे.” 
-    आपल्या चांगल्या वागणुकीमुळे सूरजने रितेश देशमुखसह सगळ्याच प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : कलर्स मराठी वाहिनी व सूरज चव्हाण इन्टाग्राम पेज ) 
 
  करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  