-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह जेव्हा राशी व नक्षत्र परिवर्तन करतात तेव्हा त्याचा प्रभाव मानवी जीवनावर दिसून येतो.
-
शनि आणि शुक्र हे कुंभ राशीत आहेत आणि केतुची यावर दृष्टि आहे त्यामुळे विपरीत राजयोग निर्माण होत आहे.
-
त्यामुळे या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल, पण काही अशा राशी आहेत, त्यांच्यासाठी हे विशेष फलदायी ठरेल.
-
ज्योतिषशास्त्रानुसार जन्मकुंडलीत सहाव्या, आठव्या आणि बाराव्या घरातील स्वामी युतीत असताना त्यातून जो योग तयार होतो. त्याला विपरित राजयोग म्हणतात.
-
हा सर्वोत्तम योग मानला जातो. विपरीत राजयोगाचे तीन प्रकार आहेत. तिघांनाही आपापले महत्त्व आहे.
-
या राजयोगामुळे कोणत्या राशींना प्रचंड धनलाभाची व प्रगतीची संधी मिळू शकते. हे आपण जाणून घेऊयात. चला तर मग पाहा कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी..
-
विपरीत राजयोग तयार झाल्याने कर्क राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण तुमच्या संक्रमण कुंडलीच्या आठव्या भावात हा योग तयार होत आहे. म्हणूनच यावेळी तुम्हाला शेअर्स, लॉटरीमधून नफा मिळू शकतो. यासोबतच तुमच्या आर्थिक स्थितीत बळ येईल. यासोबतच नोकरदार लोकांसाठी हा काळ चांगला राहील.
-
विपरीत राजयोग तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. कारण हा योग तुमच्या राशीतून सहाव्या घरात तयार होत आहे. यासोबतच धनाच्या घरावर केतू ग्रह विराजमान आहे. त्यामुळे तुम्हाला यावेळी अचानक पैसे मिळू शकतात. तसेच तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते सापडू शकतात. तसेच व्यावसायिकांना यावेळी चांगला नफा मिळू शकतो.
-
विपरीत राजयोग तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होऊ शकतो. कारण तुमच्या पारगमन कुंडलीच्या तिसऱ्या घरात शनि आणि शुक्राचा संयोग होत आहे. त्यामुळे तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. तसेच, यावेळी तुम्ही कोणत्याही कर्जाची परतफेड करू शकता. त्याच वेळी, जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. या काळात तुमच्या प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील.
-
विपरीत राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. कारण तुमच्या राशीतून बाराव्या घरात शनि आणि शुक्राचा संयोग तयार होत आहे, त्यामुळे तुमच्या प्रगतीचे योग तयार होत आहेत. व्यावसायिकांना यावेळी नफा मिळू शकतो. त्याच वेळी, तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची चिन्हे आहेत. यासोबतच या काळात तुम्ही वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णयही घेऊ शकता.
-
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)
‘विपरीत राजयोग’ बनल्याने ‘या’ राशींचे नशिब पालटणार? शनि-शुक्राच्या युतीने या महिन्यात मिळू शकतो बक्कळ पैसा
Vipreet Rajyog In Kumbh: कुंभ राशीमध्ये ‘विपरीत राजयोग’ तयार होत आहे. यामुळे काही राशींच्या लोकांना शनि-सुर्यदेवाच्या आर्शिवादाने प्रचंड धनलाभाची व प्रगतीची संधी मिळू शकते.
Web Title: Vipreet rajyoga shukra and shani yuti made in kumbh these zodiac sign can get huge amount of money pdb