-
जोतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
चंद्र एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. अशा स्थितीत चंद्र कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी जोडला जातो. ज्यामुळे शुभ किंवा अशुभ योग निर्माण होतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
दरम्यान, २५ डिसेंबर २०२४ रोजी चंद्राने तूळ राशीमध्ये प्रवेश केला असून चंद्राच्या या राशी परिवर्तनाने १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींना त्याचा शुभ प्रभाव पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मेष राशींच्या व्यक्तींसाठी चंद्राचे राशी परिवर्तन लाभदायी सिद्ध होईल. आयुष्यात धनलाभ होईल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबीयात आनंदाचे वातावरण राहिल. या काळात आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचे राशी परिवर्तन खूप शुभ फळ देणारे ठरेल. या काळात तुम्हाला कुटुंबीयांची साथ मिळेल. या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठीही चंद्राचे राशी परिवर्तन अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

शनीदेव निघाले तांब्याच्या पावलांनी; २०२७ पर्यंत ‘या’ एका राशीच्या जीवनात होणार मोठ्या उलाढाली? काय होणार तुमच्या नशिबाचे?