-
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी महाविकासआघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला.
-
यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या पराभवावरून शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गाफिल राहिल्याचं म्हटलं.
-
या वक्तव्याविषयी शनिवारी (४ फेब्रुवारी) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
-
अजित पवार यांचं म्हणणं त्यांनी आमच्याकडे वारंवार व्यक्त केलं आहे – संजय राऊत
-
उद्धव ठाकरे गाफिल राहिले असं म्हणण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी आपल्या लोकांवर जास्त विश्वास ठेवला – संजय राऊत
-
त्यांनी आपल्या विश्वासू लोकांवरच जास्त विश्वास ठेवला – संजय राऊत
-
विश्वासघात हा विश्वासातील माणसाकडूनच होत असतो – संजय राऊत
-
हे अजित पवारांनाही माहिती आहे. त्यांना ते सांगायला नको – संजय राऊत
-
असं असलं तरी आम्हीही या हालचालींची माहिती उद्धव ठाकरेंना देत होतो – संजय राऊत
-
याबाबत फक्त अजित पवार सांगत होते किंवा अन्य लोक सांगत होते असं नाही – संजय राऊत
-
या हालचालींचा सुगावा सगळ्यांनाच लागला होता – संजय राऊत
-
यानंतरही उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं की, हे आपले लोक आहेत, विश्वासाचे लोक आहेत – संजय राऊत
-
ते स्वतःला निष्ठावान, कडवट लोक म्हणवतात. त्यांच्यावर असा अविश्वास दाखवणं योग्य नाही. आपण त्यांच्याशी बोलू, असं उद्धव ठाकरे म्हणत – संजय राऊत
-
शिवसेनेने वारंवार त्यागाची भूमिका ठेवली – संजय राऊत
-
आपल्यामुळे महाविकासआघाडीचं नुकसान होऊ नये, अशी भूमिका घेतली – संजय राऊत
-
आमच्या सर्वांचा राजकीय शत्रू एकच आहे. त्यांचा पराभव झाला पाहिजे – संजय राऊत
-
विधान परिषद निवडणुकीत आम्ही ते करून दाखवलं – संजय राऊत
-
पाच पैकी चार जागा मविआकडे आहे. एक जागा भाजपाने जिंकली आहे. अमरावती आणि नागपूर या दोन महत्त्वाच्या जागा मविआने जिंकल्या – संजय राऊत
-
हा विजय आमच्या एकीमुळे झाला आहे – संजय राऊत
-
कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा मविआ एकत्रित लढेल – संजय राऊत
-
चिंचवडची जागा शिवसेनेने लढावी अशी आमची भूमिका आहे. आग्रह आहे. तरी आम्ही महाविकासआघाडी म्हणून निर्णय घेऊ – संजय राऊत
-
या दोन्ही जागी जिंकण्याची सर्वाधिक संधी कोणाला आहे? हे ठरवलं जाईल. त्यानुसार निर्णय घेतला जाईल – संजय राऊत
-
आमच्यात कोणतेही मतभेद, रस्सीखेच नाही. मविआने जिंकणं हेच आमचं एकमेव ध्येय आहे – संजय राऊत
-
अंधेरीची पोटनिवडणूक आम्ही जिंकलो तेव्हा सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिला – संजय राऊत
-
विधान परिषद निवडणुकीत आम्ही एकमेकांना मदत केली – संजय राऊत
-
कसबा आणि चिंचवडमध्येही आम्ही त्याच प्रेरणेने लढू – संजय राऊत
-
सर्व छायाचित्र – संग्रहित
“त्या हालचालींचा सुगावा सगळ्यांनाच लागला होता, यानंतरही उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं की…”, संजय राऊतांचं वक्तव्य
अजित पवारांच्या वक्तव्याविषयी शनिवारी (४ फेब्रुवारी) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
Web Title: Sanjay raut comment on ajit pawar remark over nashik graduate constituency election result pbs