-
हेनरिक क्लासेन
सनरायझर्स हैदराबाद (SRH) चा फलंदाज असलेल्या हेनरिक क्लासेनने आयपीएल २०२५ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध ३९ चेंडूत नाबाद १०५ धावा केल्या. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर त्याने ७ चौकार आणि ९ षटकार मारले. त्याने ३७ चेंडूत शानगदार शतक पूर्ण केले. (Photo: IPL/Social Media) -
आयपीएलमध्ये सर्वात जलद शतकं ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. (Photo: IPL/Social Media)
-
दरम्यान क्लासेनने युसूफ पठाणची बरोबरी केली आहे, त्याने आयपीएल २०१० मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध ३७ चेंडूत शतक झळकावले होते. युसूफ त्यावेळी राजस्थान रॉयल्सकडून खेळत होता. (Photo: IPL/Social Media)
-
डेव्हिड मिलर
क्लासेनमुळे त्याच्याच देशाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड मिलर आता या यादीत चौथ्या स्थानावर घसरला आहे. मिलरने आयपीएल २०१३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध ३८ चेंडूत शतक झळकावले होते. (Photo: IPL/Social Media) -
तेव्हा मिलर किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये होता. तो आता लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) कडून खेळतो. (Photo: IPL/Social Media)
-
ट्रॅव्हिस हेड
एसआरएचचा ट्रॅव्हिस हेड आणि पंजाब किंग्जचा प्रियांश आर्य दोघेही पाचव्या क्रमांकावर आहेत. दोघांनीही ३९-३९ चेंडूत शतके केली आहेत. ऑस्ट्रेलियन फलंदाज हेडने २०२४ मध्ये आरसीबीविरुद्ध तुफानी शतक झळकावले होते तर प्रियांशने २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शतक झळकावले आहे. (Photo: IPL/Social Media) -
ख्रिस गेल
आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. (Photo: IPL/Social Media) -
वेस्ट इंडिजचा या महान फलंदाजाने २०१३ मध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये ३० चेंडूत शतक ठोकले होते. पुणे वॉरियर्सविरुद्ध आरसीबीकडून खेळताना त्याने हा पराक्रम केला. (Photo: IPL/Social Media)
-
वैभव सूर्यवंशी
१४ वर्षीय वैभव सूर्यवंशी या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर सूर्यवंशीने आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध ३५ चेंडूत शतक पूर्ण केले. तो आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. (Photo: IPL/Social Media) हेही पाहा- ‘विरुष्का’ झाले भक्तीत तल्लीन! वृंदावनानंतर अयोध्येतील हनुमान गढी मंदिरात केली पूजा, पाहा फोटो

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”