-
९० चं दशक हे भारतात जागतिकीकरणाचं दशक मानतात. या काळात बरेच नवनवे बदल घडले आणि या काळात जन्मलेल्या लोकांनी ते बदल अनुभवले आहेत. भारतीयांची जीवनशैली कायमची बदलून टाकणाऱ्या या काळातील काही आठवणींना आपण उजाळा देऊयात.
-
आजकाल सर्रास लोकं छोटासा मोबाइल घेऊन आणि वायरलेस हेडफोन्स टाकून मोबाइलमध्ये हवं ते ऐकतात, पण ९० च्या काळात या ‘वॉकमॅन’ आणि ‘डिस्कमॅन’ची मजा काही औरच होती. डिस्कमॅन घेऊन फिरणं हे त्याकाळी तरूणांमध्ये ‘कूल ड्युड’ असण्याचं लक्षण मानलं जायचं.
-
संगणक हे तंत्रज्ञान राजीव गांधी यांच्यामुळे आलं असं म्हणतात. पण ज्यांच्याकडे हे पहिले संगणक आले असतील किंवा ज्यांनी वापरले असतील त्यांनी माऊसच्या आतला हा रबरी बॉल नेमकं काय काम करतो हे जाणून घेण्यासाठी एकदा तरी माऊस उघडलाच असेल.
-
आता सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपमुळे साऱ्या जगाशी आपण फुकटात जोडलो गेलो आहोत, पण ९० च्या दशकातील लोकांना एका एसएमएससाठीसुद्धा भरपूर पैसे मोजावे लागायचे, तसच मोबाईलमधला इनबॉक्स फूल झाला की हा मेसेज पाहून कित्येक जण हैराण व्हायचे.
-
जसजसं तंत्रज्ञान प्रगत होत गेलं, तसं कम्प्युटरमध्येसुद्धा बदल झाले. याच कम्प्युटरमधला सर्वात लोकप्रिय गेम म्हणजे ‘जीटीए व्हाईस सिटी’. मुलगा असो वा मुलगी, प्रत्येकाने हा गेम त्यांच्या आयुष्यात एकदा तरी खेळला असेल आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या चिट्सबद्दलही तुम्हाला ठाऊक असेलच.
-
आजकाल सर्रास मोबाइलवर ‘पबजी’ सारखे भन्नाट गेम खेळणाऱ्या लोकांना त्यावेळच्या कम्प्युटरमधल्या पत्त्यांच्या गेमची मजा नाही समजणार हेदेखील तितकंच खरं आहे.
-
हे असे ‘एरर’ त्या काळी कम्प्युटरवर आले की लोकांच्या काळजाचा ठोका नक्की चुकायचा.
-
कम्प्युटरप्रमाणेच या व्हिडिओ गेम्सची सर आजच्या कोणत्याच स्मार्टफोनमधल्या गेमला येणार नाही.
-
९० च्या काळात सर्वात जास्त खेळला जाणारा हा गेम आजही प्रत्येकाला आठवत असेल.
-
तेव्हा ब्रॉडब्रॅंड कनेक्ट होण्यासाठी अशी वाट पहावी लागायची.
-
आपल्याला हवं ते गाणं रींगटोन म्हणून सेट करायचं असेल तर ही शक्कल लढवावी लागत असे.
-
टेपरेकॉर्डरवर गाणं रेकॉर्ड करणं आणि इंटरनेटच्या एका क्लिकवर आपल्याला हवंय ते गाणं ऐकायला मिळणं यामध्ये बराच फरक होता.
-
पेनड्राइव, हार्डडिस्कच्याही आधी फ्लॉपीडिस्कमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी जपून ठेवता यायच्या.
-
फ्लॉपीनंतर सीडी या प्रकाराने सगळ्यांना वेड लावलं होतं. आपल्यापैकी कित्येकांच्या घरात असं एखादं तरी सीडी फोल्डर आपल्याला नक्की सापडेल.
-
डोळ्याची पापणी लवताच इकडची दुनिया तिथे होण्याचा हा काळ. त्याकाळी एखादी फाइल कम्प्युटरवरुन ट्रान्सफर करताना एवढी वर्षं लागायची. (फोटो सौजन्य : फेसबूक)

माजी भाजपा नेत्याबरोबर ‘त्या’ आक्षेपार्ह व्हिडीओमध्ये दिसणारी महिला नेमकी कोण?