गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने १६० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीतील एका उमेदवाराने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. ३० वर्षीय भुलतज्ज्ञ पायल कुकरानी यांना भाजपाने अहमदाबादेतील नरोदा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. २००२ च्या गुजरात दंगल प्रकरणात शिक्षा झालेल्या ३२ जणांपैकी एक पायल कुकरानी यांचे वडील आहेत. नरोदा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बलराम थवानी यांना भाजपाने तिकीट नाकारलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Gujarat Election 2022 : भाजपची पहिली यादी जाहीर, ३८ विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारली, हार्दिक पटेल यांना मात्र संधी

पायल कुकरानी या एका खाजगी रुग्णालयात भुलतज्ज्ञ आहेत. पायल यांच्या आई रेशमा अहमदाबादच्या साईजपूर बोघा वॉर्डाच्या नगरसेविका आहेत. नरोदा शहरात फेब्रुवारी २००२ मध्ये दंगली उसळल्या होत्या. या दंगलीमध्ये ९६ हून अधिक मुस्लीम लोकांची हत्या करण्यात आली होती. दंगलीदरम्यान अनेक महिलांवर बलात्कार करण्यात आले होते. जमावाने पीडितांची घरं पेटवून दिली होती. जमावाच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले होते. या दंगलीत पायल कुकरानी यांचे वडिलही सामील होते.

Gujrat Election 2022 : १० वेळा आमदार राहिलेल्या आदिवासी चेहऱ्याचा काँग्रेसला ‘रामराम’, भाजपात केला प्रवेश

खून, दंगल, प्रार्थनास्थळाचा अवमान करणे, दंगल भडकवणे या आरोपांखाली मनोज कुकरानीला न्यायालयाने दोषी ठरवले होते. मनोज कुकरानीला न्यायालयाने २१ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेविरोधात दोषीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हा खटला अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

Gujarat Assembly Elections : मोरबी पूल दुर्घटनेत लोकांचे जीव वाचविणाऱ्याला भाजपाने दिली उमेदवारी; विद्यमान आमदाराचं तिकीट कापलं

२००२ मध्ये नरोदा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या माया कोडनानी यांनाही नरोदा पाटिया प्रकरणात अहमदाबादच्या विशेष न्यायालयाने २०१२ मध्ये दोषी ठरवले होते. त्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने २०१८ मध्ये कोडनानी यांच्यासह १३ जणांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली होती. तर १६ जणांची शिक्षा कायम ठेवली होती.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2002 gujarat riot convicts daughter payal kukrani is bjp candidate from naroda assembly in gujarat election rvs
First published on: 12-11-2022 at 17:35 IST