महेश सरलष्कर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मतदारांची नाराजी कमी करण्यासाठी भाजपकडून प्रत्येक निवडणुकीत नव्या उमेदवारांना संधी दिली जाते. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने गुरुवारी १६० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून ३८ विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.

मात्र, काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांपैकी सात नेत्यांना उमेदवारी देण्यात आली असून बहुचर्चित हार्दिक पटेल यांना विरामगाम इथून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. अल्पेश ठाकूर हे देखील काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते, दुसऱ्या यादीत त्यांचाही समावेश होण्याची शक्यता मानली जात आहे.

हेही वाचा… Gujarat Assembly Elections : मोरबी पूल दुर्घटनेत लोकांचे जीव वाचविणाऱ्याला भाजपाने दिली उमेदवारी; विद्यमान आमदाराचं तिकीट कापलं

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल घाटलोडिया मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे या दोघांनीही स्वतःहून निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. माजी मंत्री भूपेंद्र सिंह चुडासमा, सौरभ पटेल, विभावरी दवे यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे.

हेही वाचा… Gujarat Elections: रवींद्र जडेजाच्या पत्नीला भाजपाचं तिकीट; गुजरात निवडणुकीतून राजकीय पदार्पण!

जामनगर- उत्तर मतदारसंघामधून भाजपने नवा चेहरा दिला असून या मतदारसंघात रिवाबा जडेजा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रिवाबा या क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांच्या पत्नी असून तीन वर्षांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून त्या राजकारणात सक्रिय असून जामनगर भागामध्ये विविध संस्था-संघटनांशी जोडलेल्या आहेत. राजपूत समाजातील रिवाबा या करणी सेनेच्या महिला विभागाच्या अध्यक्ष आहेत. मोरबी पूल दुर्घटनेत अनेकांचे प्राण वाचवणारे भाजपचे माजी आमदार कांतिलाल अमृतिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

हेही वाचा… Gujarat Election: भाजपाने पत्नीला तिकीट दिल्यानंतर रवींद्र जाडेजाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला “तुझे प्रयत्न आणि मेहनत…”

गुजतरामधील १८२ जागांपैकी पहिल्या टप्प्यातील ८९ जागांवर १ डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्यापैकी ८४ जागांवरील उमेदवारांची यादी केंद्रीयमंत्री भूपेंद्र यादव यांनी गुरुवारी जाहीर केली. ५ डिसेंबरला होणाऱ्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यातील ९३ जागांपैकी ७६ जागांवरील उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थितीत केंद्रीय निवड समितीच्या बैठकीत पहिल्या यादीतील उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. गेले दोन दिवस दिल्लीत शहांच्या निवासस्थानी गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For gujarat assembly election bjp declared first list 38 sitting mlas rejected hardik patel get a ticket print politics news asj
First published on: 10-11-2022 at 17:31 IST