हर्षद कशाळकर

अलिबाग- उदय सामंत यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याला पालकमंत्री लाभले आहेत. ते कोकणातीलच आहेत. रायगड आणि रत्नागिरी दोन्ही जिल्ह्याचे काम ते चांगल्या पध्दतीने सांभाळत आहेत. त्यामुळे एक पालकमंत्री असतांना मी पालकमंत्री होणे या गोष्टीला फारसे महत्व द्यायला नको असे म्हणत महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी पालकमंत्री पदाच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Deputy Chief Minister Ajit Pawar supported Tingre and condemned attempt to defame him
‘दिवटा आमदार’ या शरद पवारांच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले कडक उत्तर म्हणाले…!
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Ajit Pawar retirement jibe at uncle Sharad Pawar,
पिंपरी : वडिलधाऱ्यांनी वयाच्या सत्तरीनंतर मुलांकडे जबाबदारी दिली पाहिजे; अजित पवार यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा
cost of inauguration ceremony of Metro should be taken from honorarium of cm and Deputy cm says MLA Ravindra Dhangekar
मेट्रोच्या उदघाटन सोहळ्याचा खर्च मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मानधनामधून घेतला पाहिजे : आमदार रवींद्र धंगेकर
Controversy over ministership in Shiv Sena
शिवसेनेतील मंत्रिपदाची रस्सीखेच चव्हाट्यावर
Jagan Mohan Reddy
नायडूंना खोटे बोलण्याची सवयच, जगन मोहन रेड्डी यांचे मोदींना पत्र; मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप
eknath shinde on one nation one election
CM Eknath Shinde : ‘एक देश, एक निवडणुकी’च्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “या निर्णयामुळे…”
aap leader Atishi
विश्लेषण: पहिल्यांदाच आमदार, पाठोपाठ दिल्लीचे मुख्यमंत्रीपद; आतिशींच्या निवडीमागे ‘आप’चे कोणते समीकरण?

गेल्या काही दिवसांपासून रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुती सरकारमध्ये बेबनाव असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पद मिळावे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनील तटकरे आग्रही असल्याचे बोलले जात होते. पण शिवसेना आमदारांच्या विरोधामुळे आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पद देण्यात आले नव्हते. त्यामुळे आदिती तटकरे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. पण कुठल्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असावे हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे यासंदर्भात नाराजीचा प्रश्नच उद्भवत नाही. मला ज्या खात्याचा पदभार दिला आहे, त्यात चांगले काम करण्याचा माझा प्रयत्न आहे.

आणखी वाचा-हरियाणामध्ये ‘आप’चा स्वबळाचा नारा; पंजाबमधील मंत्रिमंडळावर लोकसभेची जबाबदारी

कुठले पद कोणाकडे आहे. यापेक्षा आम्ही सगळे सत्तेत आहोत, सगळ्यांच्या सहकार्याने काम करत आहोत, रायगड जिल्ह्याला याचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल यासाठी प्रयत्न करत आहोत. अलिबाग येथील मेडीकल कॉलेजचा प्रश्न रेंगाळला होता. त्यासंदर्भात दोन बैठका घेऊन तो मार्गी लावला आहे. माणगाव येथील विभागीय क्रीडा संकूलाला मंजूरी मिळाली होती. पण त्यात तांत्रिक अडचणी होत्या त्या दूर केल्या. रोहा येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या काम मार्गी लावले आहे. त्यामुळे पदापेक्षा जनतेची कामे कशी मार्गी लावता येतील याला जास्त महत्व असल्याचे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. उदय सामंत हे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत, असे म्हणत त्यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.