मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराच्या विरोधात आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ठाकरे गटाने शनिवारी मोर्चा आयोजित केला असतानाच त्याच दिवशी आदित्य यांचे एक निकटवर्तीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होणार आहेत. ठाकरे विरुद्ध शिंदे गटातील संघर्ष सध्या तीव्र झाला आहे. दोन्ही गट परस्परांनाना शह देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुंबईत ठाकरे गटावर फारसा परिणाम झाला नव्हता. अगदी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यावरही ठाकरे गटात गळती लागली नव्हती. ठाकरे गटाची मुंबईत ताकद अबाधित असल्यानेच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेण्याचे धाडस भाजप व शिंदे गटात झाले नव्हते, असे बोलले जाते. पण गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरे गटाचे आजी-माजी लोकप्रतिनिधी शिंदे गटात प्र‌वेश करू लागले आहेत. विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

हेही वाचा >>> जमाखर्च : देवेंद्र फडण‌वीस; पुन्हा आले, पण….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई महानगरपालिकेतील काही माजी नगरसेवकांनीही अलीकडेच शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटाने सध्या आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. करोना काळातील आरोग्य सेवेतील गैरव्यवहारांवरून आदित्य ठाकरे यांचे एक निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या निवासस्थानावर ईडीने छापा घातला. याशिवाय त्यांची चौकशीही करण्यात आली. आदित्य यांचे अन्य एक निकटवर्तीय शिंदे गटाच्या गळाला लागला आहेत. आदित्य ठाकरे यांच्या खास मित्राची मध्यंतरी केंद्रीय यंत्रणेकडून चौकशी सुरू झाली होती. त्यांच्या निवासस्थानावर छापाही पडला होता. मध्यंतरी ठाकरे व त्यांच्या त्या मित्राचे संबंध दुरावल्याचेही बोलले जाऊ लागले. युवासेनेच्या गाभा समितीतून मग ते बाहेर पडले. आदित्य ठाकरे यांनी शनिवारी मोर्चा आयोजित केला असतानाच त्याच दिवशी आदित्य यांचे एकेकाळचे निकटवर्तीय शिंदे सेनेत प्र‌वेश करणार आहेत. यातून शिंदे हे ठाकरे यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत.