तुकाराम झाडे

हिंगोली: दोन वेगवेगळया विचारसरणीत वाढलेल्या आणि विरोधी पक्षांकडून ‘युवराज’ या प्रतिमेत अडकविलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आदित्य ठाकरे यांना पाहण्यासाठी कळमनुरी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. सदृढ लोकशाहीसाठी हे अधिक चांगले असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेकडून व्यक्त करण्यात येत आहे.

शिवसेना हा आमचा नैर्सगिक मित्र आहे का, असा प्रश्न भारत जोडो यात्रे पूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे शिवसेनेचा यात्रेत सहभाग असेल का, कोण सहभागी होईल याविषयीचे तर्कविर्तक आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे आता बाजूला पडले आहेत. काँग्रेसच्या यात्रेला राज्यातील विविध पक्षांकडून दिला जाणारा पाठिंबा लक्षणीय मानला जात आहे. यात्रे दरम्यान चालताना राहुल गांधी यांच्याबराेबर राज्यातील उद्योगाची सुरू असणाऱ्या पळवापळवीवर तसेच सरकार विरोधी बोलणाऱ्यांची केल्या जाणाऱ्या मुस्कटदाबीवरही चर्चा झाल्याचे समजते.

हेही वाचा : ‘बी फॉर बारामती’साठी सीतारामन पुन्हा बारामतीच्या मैदानात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना व काँग्रेसमध्ये फारशी कटुता निर्माण झाली नाही. बाळासाहेब थोरात हे समन्वयकाची भूमिका सांभाळत होते. भारत यात्रेचेही ते समन्वयक आहेत. यात्रेमध्ये आदित्य ठाकरे यांचे चालणे हे शिवसेना- काँग्रेसच्या संबंधावर दीर्घकाळ परिणाम करणारे असतील, असेही सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांबरोबरच पक्षीय राजकारणात नसणाऱ्या अनेकांचा भारत जोडो यात्रेला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. अनेक लेखक, कवीही राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत.