दहा दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय लोक दल पक्षाने इंडिया आघाडीतून बाहेर पडत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, राष्ट्रीय लोक दलाच्या एनडीएतील प्रवेशाची अधिकृत घोषणा अद्यापही झालेली नाही. भाजपाच्या नेत्यांनीही या संदर्भात मौन धारण केले आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोक दल या पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दिल्लीतील राष्ट्रीय लोक दल पक्षाच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना, पक्षाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले होते.

राष्ट्रीय लोक दल पक्षाने एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आरएलडी कोणत्या जागा लढवेल, या संदर्भात राजकीय वर्तुळात अनेक चर्चा आहेत. या संदर्भात अद्याप तरी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या संदर्भात पश्चिम उत्तर प्रदेशातील भाजपाचे नेते शांत आहेत. त्याबाबत राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया येथील नेत्यांनी दिली आहे; तर बागपत, बिजनौर, कैराना व मथुरा या चार लोकसभा जागांबाबत दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असल्याचे आरएलडीच्या नेत्याकडून सांगण्यात आले आहे.

What Abu Azmi Said?
अबू आझमींचं पक्ष सोडण्याच्या चर्चांवर उत्तर, म्हणाले; “होय मी नाराज आहे”
NCP releases manifesto
भाजपला नकोसे मुद्दे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात; जातनिहाय जनगणना, किमान आधार मूल्याचे अजित पवार गटाकडून आश्वासन
Do not participate in party campaign without consent confusion due Vanchits new Instructions
… तोपर्यंत मित्र पक्षाच्या प्रचारात सहभागी होऊ नका, वंचितच्या फतव्याने संभ्रम
25 prominent politicians joined BJP
आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’

हेही वाचा – संदेशखाली हिंसाचारामुळे ममतांचा तृणमूल काँग्रेस पक्ष अडचणीत, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रीय लोक दल पक्षाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी गेल्या आठवड्यात त्यांचे आजोबा आणि देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचे जन्मस्थान असलेल्या हापूर जिल्ह्यातील नुरपूर या गावाला भेट दिली होती. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याच्या कारणाबाबत विचारले होते. मात्र, त्यांनी त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले. “ज्यावेळी आमच्या पक्षाची एनडीएतील समावेशाची अधिकृत घोषणा होईल, त्यावेळी मी इंडिया आघाडीतून बाहेर पडणाच्या कारणांबद्दल बोलेन”, असे ते म्हणाले होते. तसेच युतीचा निर्णय अंतिम असून, केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे, असेही त्यांनी सांगितले. त्याशिवाय मी बागपतमधून निवडणूक लढवावी, अशी पक्षातील नेत्यांची इच्छा आहे, असेही त्यांनी नमूद केले होते.

दरम्यान, बागपत लोकसभा मतदारसंघातील छपरौली येथे अजित सिंह यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळी आरएलडीच्या एनडीएतील प्रवेशाची अधिकृत घोषणा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या संदर्भात बोलताना, या कार्यक्रमापूर्वी आरएलडी-भाजपा युतीची घोषणा होणे आवश्यक आहे, असे आरएलडीच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमधील शेतकरी संघटनांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे आरएलडी-भाजपा युतीची घोषणा लांबणीवर पडत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या आरएलडीचे अध्यक्ष जयंत चौधरी शेतकरी आंदोलनावर शांत का, असा प्रश्न त्यांच्या पक्षातील नेत्यांना पडला असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. आरएलडीच्या वरिष्ठ नेत्याने या संदर्भात बोलताना, शेतकरी मागण्यांसदर्भात तोडगा निघाल्यावरची वेळ युतीच्या घोषणेसाठी योग्य असेल, असे म्हटलेय.

या संदर्भात बोलताना, आरएलडीचे राष्ट्रीय प्रवक्ते मोहम्मद इस्लाम म्हणाले, “शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर जयंत चौधरी शांत आहेत, असं म्हणणं चुकीचं आहे. आरएलडी हा शेतकऱ्यांचा पक्ष आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या मुद्दय़ांवर केंद्र सरकार आणि एनडीएच्या मित्रपक्षांशी आरएलडी चर्चा करीत आहेत. हा विषय चर्चेतून सोडवला जावा, अशी आमची इच्छा आहे. त्यात कोणत्याही पक्षाने राजकारण करू नये. जयंत चौधरीही या प्रकरणी सरकारच्या संपर्कात आहे.

हेही वाचा – पीडीपीचा वरिष्ठ नेता भाजपात जाणार? जम्मू-काश्मीर येथे पंतप्रधानांच्या रॅलीतील उपस्थितीने चर्चेला उधाण

विशेष म्हणजे २०२० साली कृषी कायद्याविरोधात झालेल्या शेतकरी आंदोलनात आरएलडीने सक्रिय सहभाग घेतला होता. आरएलडीचे संस्थापक अजित सिंग यांनी, शेतकऱ्यांना एकत्र येत भाजपाचे सरकार पाडण्याचे आवाहन केले होते.