Sandeshkhali Violence पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखाली येथे काही दिवसांपूर्वी लैंगिक हिंसाचाराची घटना घडली. या घटनेने पश्चिम बंगाल येथील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. हा आता एक राजकीय मुद्दा बनला आहे. भाजपाने या विषयाला खतपाणी घातल्याचा आणि हिंसा भडकवल्याचा आरोप, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तर राज्य सरकारने घटनास्थळी भेट देण्याची परवानगी नाकारल्याचा आरोप, विरोधकांनी केला आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या (एनसीडबल्यु) अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सोमवारी सांगितले की, संदेशखाली येथील महिलांकडून आतापर्यंत १८ तक्रारी आल्या आहेत, यापैकी दोन तक्रारी बलात्काराच्या आहेत. १२ फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आरोप केला की, टीएमसी कार्यकर्त्यांकडून खालच्या जातीतील हिंदू महिलांचा नियमित लैंगिक छळ केला जात आहे. भाजपाच्या इतर नेत्यांकडूनही टीएमसी नेते आणि ममता बॅनर्जी यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत.

narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
cm siddaramaiah
कर्नाटकात ५० खोके प्रयोग; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपावर केला खळबळजनक आरोप
prashant kishor
“…तर राहुल गांधींनी राजकारणातून बाजूला व्हावं”, प्रशांत किशोर यांचा सल्ला
Complaint against Fadnavis
फडणवीस व भाजप उमेदवार राम सातपुतेंविरुद्ध आचार संहिता भंग केल्याची तक्रार, मोची समाजाला प्रलोभन दाखविण्याचा आरोप

गेल्या महिन्यात संदेशखालीत नेमके काय घडले?

५ जानेवारी रोजी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने रेशन घोटाळ्याप्रकरणी टीएमसी नेते शेख शाहजहान यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी ईडीच्या अधिकार्‍यांवर जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात ईडीचे तीन अधिकारी जखमी झाले. याचवेळी माध्यमांच्या ताफ्यावरही हल्ला झाला, असे सांगण्यात आले. या घटनेनंतर शाहजहान फरार होता.

शहाजहान फरार झाल्याच्या एक महिन्यानंतर, म्हणजेच ८ फेब्रुवारीला संदेशखळी येथील महिलांचा एक गट झाडू आणि काठ्या घेऊन रस्त्यावर उतरला. या महिलांनी टीएमसी नेते शेख शाहजहान आणि त्यांचे सहकारी शिबू प्रसाद हाजरा आणि उत्तम सरदार यांना अटक करण्याची मागणी केली. दुसर्‍या दिवशी टीमसी नेत्याच्या पोल्ट्री फार्मला महिला आंदोलकांनी आग लावली. स्थानिकांनी संगितले की, टीएमसी नेत्याने स्थानिकांकडून बळकावलेल्या जमिनीवर हा पोल्ट्री फार्म सुरू होता. या जमिनीवर अनेक बेकायदेशीर कारवाया सुरू असल्याचा आणि शाहजहान आणि त्याचे समर्थक वर्षानुवर्षे त्यांचे शोषण करत असल्याचा आरोप या महिलांनी केला.

यामुळे टीएमसी आणि विरोधी पक्ष; विशेषत: भाजपा यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली. गेल्या शुक्रवारी काँग्रेस आणि भाजपाच्या शिष्टमंडळाला संदेशखाली येथे येण्यापासून रोखण्यात आले होते. भाजपा आणि आरएसएसवर या भागात हिंसा भडकवत असल्याचा आरोप, ममता बॅनर्जी यांनी केला. १५ फेब्रुवारीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले की, “भाजपा कार्यकर्त्यांना या भागात कसे आणले गेले आणि परिसरात (संदेशखाली) हिंसाचार कसा भडकावला गेला, हे समोर आले आहे. त्यांना शेख शाहजहान यांच्यावरच हल्ला करायचा होता. या घटनेनंतर त्यांनी परिसरातून सर्वांना बाहेर काढले आणि आदिवासी विरुद्ध अल्पसंख्याक संघर्ष सुरू असल्याचा बनाव रचला.” त्या पुढे म्हणाल्या, “हे नवीन नाही. आरएसएसचा या भागात इतिहास राहिला आहे. सात-आठ वर्षांपूर्वी या भागात दंगली झाल्या होत्या. सरस्वती पूजेच्या वेळीही आम्ही परिस्थिती मजबूतपणे हाताळल्याने परिस्थिती नियंत्रणात राहिली, असेही त्या म्हणाल्या.

भाजपाने हे आरोप फेटाळून लावले. “टीएमसी आता या सर्व गोष्टी सांगून घडलेल्या घटनेवर पडदा टाकण्याचे काम करत आहे. मुख्य आणि गंभीर गोष्ट म्हणजे बसीरहाटमध्ये गेल्या १० वर्षांपासून लोकांचा छळ होत आहे आणि याच विरोधात लोक आता बंड करत आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत टीएमसीला याचे परिणाम दिसतील,” असे विरोधी पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

संदेशखालीच्या घटनेमुळे टीएमसी संकटात येऊ शकते का?

टीएमसीच्या एका नेत्याने सांगितले की, गेल्या जनगणनेच्या अहवालानुसार, संदेशखालीची ३०% लोकसंख्या अल्पसंख्याक आहे; तर ३०% दलित आणि २६% लोकसंख्या आदिवासी आहे. टीएमसीच्या सध्याच्या बसीरहाटच्या खासदार बंगाली चित्रपट अभिनेत्री नुसरत जहाँ आहेत. पक्षाच्या अंतर्गत माहितीनुसार, त्यांच्या लोकप्रियतेला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या मतदारसंघावर आपली पकड सध्या कमी असल्याचे समजत असल्याने टीएमसीसाठी हा चिंतेचा विषय ठरत आहे. आदिवासी विरुद्ध मुस्लीम असा बनाव रचल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी भाजपावर केला आहे. हा आरोप पक्षावरील आपली पकड सुटू नये, म्हणून करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. जर भाजपाने या भागात दलित आणि आदिवासींमध्ये स्वत:ला एकवटण्यात यश मिळवले, तर या भागातील टीएमसीचा प्रभाव कमी होईल; ज्याचा फायदा भाजपाला आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये होईल.

पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या टीएमसीच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, “मुख्यमंत्र्यांनी जे सांगितले ते खरे आहे. परंतु खरे सांगायचे झाले तर, संदेशखालीतील सध्याची परिस्थितीला आम्हीच जबाबदार आहोत. संदेशखालीसह शेजारच्या हरोआ आणि मिनाखान सारख्या भागातही अल्पसंख्याक समाजातील मजबूत नेते आमच्याकडे आहेत. आरएसएस ला या जागांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. संदेशखालीमध्ये, गेल्या तीन ते चार वर्षांपासून आरएसएसने नियमितपणे शिबिरे आयोजित केली आहेत आणि अल्पसंख्यांक समुदायातील टीएमसी नेत्यांनी यावर आक्षेप घेतला नाही. त्याचाच हा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले.

टीएमसी मंत्र्याची अटक

कथित रेशन घोटाळ्यात मंत्री ज्योतिप्रिया मल्लिक यांच्या अटकेपासून पक्ष पूर्वीसारखा मजबूत राहिला नाही, असे टीएमसीचे नेते आणि स्थानिक सीपीआय(एम) यांनी सांगितले. सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, “ज्योतिप्रिया मल्लिक यांच्या अटकेनंतर टीएमसीच्या सर्व नेत्यांवर याचा परिणाम झाला आहे. आताच पक्षाला सावरले नाही तर बसीरहाट लोकसभा मतदारसंघ गमवावा लागेल, हेच आमच्यासाठी मोठे आव्हान आहे.” सीपीआय(एम) जिल्हा समितीच्या नेत्याने सांगितले की, मल्लिक यांचे उत्तर २४ परगणा भागात वर्चस्व होते आणि त्यांनीच संदेशखालीसाठी शेख शाहजहान तसेच मिनाखान आणि हरोआसाठीसाठी इतर नेत्यांची नियुक्ती केली. “त्यांनी शेतजमिनींचा वापर मत्स्यपालन व्यवसायासाठी सुरू केला. मोठ्या प्रमाणावर खंडणी व भ्रष्टाचारात ते गुंतत गेले. शेतजमिनी ताब्यात घेऊन त्या जागांवर मत्स्यपालन व्यवसाय सुरू करण्यात आला. एकाही शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली नाही,” असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : मध्यमवर्गीयांना परवडणार्‍या बाईक-टॅक्सीला भारतात अधिक व्यवहार्य करण्यासाठी काय करता येईल?

जमीन बळकावल्याच्या आरोपांनंतर स्थानिक टीएमसी नेत्यांनी गेल्या शुक्रवारी या भागात सर्वेक्षण सुरू केले. ज्या शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही, त्यांना मोबदला देण्याचे आश्वासही करण्यात आले.