नागपूर : मंत्रिमंडळात विस्तार होत असताना सर्वांची भावना असते की त्यांना संधी मिळावी. सर्व जण ताकदीचे आणि सक्षम नेते आहेत. मात्र जागा मर्यादित असल्याने एकाच वेळी सर्वांना संधी देणे शक्य नाही. त्यामुळे यंदा सर्वांना संधी देण्यासाठी मंत्रिमंडळात अडीच-अडीच वर्षांचा ‘फॉर्म्युला’ ठरवला असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूरमध्ये आयोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केली.

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे रविवारी सिव्हिल लाइन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या वेळी अजित पवार कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. मागील तीन वर्षांपासून सर्व जिल्ह्यातील निवडणुका झालेल्या नाहीत. २०२२ मध्येच या निवडणुका व्हायला पाहिजे होत्या. मात्र तीन वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून कार्यकर्ते वंचित राहिले. आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महामंडळांवर नेमणुका करण्याचा निर्णय तीन महिन्यांत घेतला जाईल, असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा >>>भाजपचे धक्कातंत्र : रवींद्र चव्हाण लवकरच प्रदेशाध्यक्षपदी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही खर्च टाळता येत नाही’

महिला व बालविकास विभागाची दिलेली जबाबदारी आदिती तटकरे यांनी नीट प्रकारे सांभाळली आणि लाडकी बहीण योजना यशस्वी केली. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. काही खर्च हे आपल्याला करावेच लागतात, ते टाळता येणे शक्य नाही, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. या योजनेमुळेच इतक्या मोठ्या संख्येत आमदार निवडून आणता आले, असेही पवार म्हणाले.