scorecardresearch

“विरोधकांच्या कोणत्याही आघाडीला तेव्हा अर्थ असतो जेव्हा काँग्रेस…” जयराम रमेश यांचं सूचक वक्तव्य!

‘२०२४ साठी काँग्रेसने विरोधकांच्या आघाडीचा आधार व्हावं’ असंही म्हणाले आहेत.

Jayram ramesh
(संग्रहित छायाचित्र)

Jairam Ramesh On Opposition Alliance: लोकसभा निवडणूक-२०२४ मध्ये भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेससह विरोधी पक्षांचे सर्वप्रकारे प्रयत्न सुरू आहेत. विविध कार्यक्रम राबवले जात आहे, विरोधकांची एकजुट करण्यासाठी अनेक दिग्गज नेते प्रयत्नशील आहेत. मात्र अद्यापपर्यंत विरोधकांच्या एकजुटीच्यादृष्टीने ठोस आणि सकारात्मक अशी घडमोड घडताना दिसलेली नाही. याच दरम्यान आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी एक विधान केलं आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला टक्कर द्यायची असेल तर काँग्रेसला विरोधी पक्षांच्या आघाडीचा आधार झालं पाहिजे, काँग्रेस शिवाय कोणतीही आघाडी अर्थपूर्ण ठरू शकत नाही. असं ते म्हणाले आहेत.

याचबरोबर जयराम रमेश यांनी म्हटले की, भाजपाला पराभूत करण्यासाठी कोणतीही विरोधी आघाडी दोन वास्तविकतांवर आधारित असायला हवी. पहिली काँग्रेस कोणत्याही विरोधी आघाडीचा आधार असायला हवा आणि दुसरी कोणतीही विरोधी आघाडी रचनात्मक धोरणावर आधारित असायला हवी, केवळ भाजपाविरोधी आणि सरकारविरोधी धोरणावर नाही. ती केवळ एक सकारात्मक, रचानात्मक धोरणावर आधारित असली पाहिजे.

जम्मू-काश्मीरमधील लोकांना शांतता हवी आहे –

पुलवामामध्ये भारत जोडो यात्रेत त्यांनी म्हटले की, जम्मू-काश्मीरचे लोकांना शांतीपूर्ण आणि लोकशाहीचं जीवन हवं आहे. निवडणूक व्हावी अशी त्यांची मागणी आहे आणि त्यांची ही मागणी पूर्ण केली पाहिजे. याशिवाय त्यांनी हेही सांगितले की काँग्रेसने सार्वत्रिक निवडणुकांमध्ये प्रत्येक राज्यात स्वबळवार लढण्याची तयारी करायला हवी.

भाजपाला पराभूत करण्यासाठी एकजुटीचे प्रयत्न –

भाजपाला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र आणलं जात आहे. आतापर्यंत काँग्रेस यामध्ये मागे दिसत होती, मात्र जयराम रमेश यांनी हे स्पष्ट केलं की तेही यासाठी प्रय़त्न करत आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 19:44 IST
ताज्या बातम्या