केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकुर हे सध्या त्यांच्या गृहराज्य असलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुकीच्या धामधुम व्यस्त आहेत. ते दिवसभरात लहान-मोठ्या अशा १५ ते १६ प्रचार रॅलींना संबोधित करत आहेत. सकाळी लवकर सुरू झालेल्या प्रचारसभा रात्री उशीरापर्यंत सुरू राहत आहेत. अनुराग ठाकूर यांनी दावा केला आहे की या निवडणुकीत भाजपाच्या जागा वाढणार आहेत आणि गुजरातमध्ये तर विक्रम मोडीत काढणार आहे. अनुराग ठाकूर यांनी काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, पाहूयात काय म्हणाले आहेत.


१. तुम्हाला दिल्लीचे हवामान आवडते की शिमलाचे?
– हवामान प्रत्येक ठिकाणचे चांगले आहे, ते व्यक्तीवर अवलंबून असते.


२. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांनी काही महिन्यांपूर्वी तुम्हाला हिमाचल प्रदेशमधून भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले होते
– यावर उत्तर देताना अनुराग ठाकूर म्हणाले, जयराम ठाकूर सरकारने हिमाचल प्रदेशमध्ये अद्भुत काम केले आहे. भाजपा जयराम ठाकूर यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवत आहे, यामध्ये काहीच किंतू-परंतु नाही.

३. हिमाचलमध्ये आम आदमी पार्टीबाबत तुम्ही काय विचार करता?
– त्यांनी बराच अगोदर आपले दुकान बंद केले होते.

आणि काँग्रेस? – भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट लढाई आहे, परंतु ते आपले खातेही उघडू शकलेले नाहीत.

४. आपल्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे काय आहेत? –
महिलांसाठी स्वतंत्र जाहीरनामा आहे. यामध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण, गर्भवती महिलासांठी २५ हजार रुपये, इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या मुलींसाठी सायकल आणि महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींसाठी स्कुटीचे आश्वासन देण्यात आले आहेत. याशिवाय गरीब महिलांसाठी तीन एलपीजी सिलिंडर, याचबरोबर स्वयं सहयता गटांसाठी दोन टक्के व्याज सवलत आणि होमस्टे महिलांसाठी व्याजमुक्त कर्ज, याशिवाय आयुष्मान भारत आणि हिमकेअर अंतर्गत महिलांसाठी अन्य आजारांचाही समावेश केला जाईल, ज्यांचा अगोदर समावेश नव्हता.

५. तुम्हाला वाटत नाही का सायकल आणि स्कूटी मोफत मिळण्याच्या श्रेणीत येतात, असे तुम्हाला वाटत नाही का?
नाही, ते (साधने) सक्षमीकरण आहेत. आम्ही सर्व मुलींना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहित करू इच्छितो. हे त्यांना मदत करणारे आहे, त्यांना मजबूत करणार आहे.

६. भाजपा पुन्हा सत्तेत येत आहे? –
होय नक्कीच, यामध्ये काहीच शंका नाही. डबल इंजिन सरकारने सर्वच क्षेत्रात चांगले प्रदर्शन केले आहे, मग ते रस्ते, रेल्वे, आरोग्य, शिक्षण, पाणी किंवा कोणत्याही प्रकारच्या पायाभूत सुविधा असतील. याशिवाय समाजकल्याण योजनांची मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

७. हिमाचल प्रदेशमध्ये तुम्हाला किती जागा जिंकण्याचा अंदाज आहे?
– आम्ही मागीलवेळी पेक्षा जास्त जागा जिंकू, ४४ आकडा ओलांडू.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

८. गुजरातबद्द काय सांगाल?
– गुजरातमध्ये आम्ही मागील ३० वर्षांचे सर्व विक्रम मोडीत काढू. हा भाजपाचा ऐतिहासिक विजय असणार आहे. पंतप्रधान मोदींचे विकास कार्य आणि डबल इंजन सरकारने तिथे जे दिले आहे, त्याचे सर्वांनीच कौतुक केले आहे.