खानापूर आटपाडीचा पुढचा आमदार कोण असेल हे ठरविण्याचा अधिकार केवळ जनतेचाच आहे, कोणा एकाला पुढचा लोकप्रतिनिधी ठरविण्याचा ठेका जनतेने दिलेला नाही ,अशा शब्दांत बाळासाहेबांची शिवसेनाचे आमदार अनिल बाबर यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनाच प्रतिआव्हान दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- औरंगाबाद शिक्षकमधील भाजपची मरगळ दूर

काही दिवसांपूर्वी खानापूर तालुक्यात मोही येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार पडळकर यांनी बारामतीमध्ये झालेल्या चर्चेचा संदर्भ देत २०२४ चा आमदार भाजपचाच असेल असे जाहीर वक्तव्य करून आमदार बाबर यांना एकप्रकारे घरी बसण्याचाच सल्ला दिला होता. यापुर्वीही पडळकर यांनी बाबर यांना मागील निवडणुकीत चूक केली, आता ही चूक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगून सुधारली जाईल असे सांगितले होते.

हेही वाचा- रामचरितमानसच्या वादावर आता भाजपाच्या खासदार संघमित्रा मौर्या म्हणतात, वाद नको पण….

खानापूर-आटपाडी मतदार संघातून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी आमदार बाबर आणि माजी आमदार सदाशिवराव पाटील यांची लढत झाली होती. यावेळी आमदार बाबर यांनी मुलासह आमदार पडळकर यांची बारामतीच्या विश्रामधामवर भेट घेउन आपली ही शेवटचीच निवडणूक असून यावेळी सहकार्यासाठी हात पुढे केला होता. त्यांनीच ही शेवटची निवडणूक असल्याचे सांगितल्याने आगामी निवडणुीत आमदार बाबर हे उमेदवार असणार नाहीत असे सांगत एकप्रकारे आमदार बाबर यांनाच शह देण्याचा प्रयत्न आमदार पडळकर यांनी मोहीच्या जाहीर सभेत केला होता.
आगामी निवडणुका बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप एकत्रित लढविण्याचे संकेत मिळत असताना खुद्द भाजपमधूनच आमदार बाबर यांना आव्हान देण्याचा प्रयत्न पडळकर यांच्याकडून सुरू आहेत. यावेळी आमदार . बाबर यांनी कुठे काय बोलायचे याचे संस्कार आपणावर आहेत असे सांगून पडळकर यांच्यावरील संस्कारावर प्रश्‍नचिन्हच उपस्थित केले होते.

हेही वाचा- ‘शिवशक्ती-भीमशक्ती’चा प्रयोग बुलढाण्यात यशस्वी होणार?

राज्य पातळीवर बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप एकत्र असले तरी गावपातळीवर या दोन पक्षांमध्ये बेबनाव सुरू झाला आहे. याचे पडसाद ग्रामपंचायत निवडणुकीच्यावेळी दिसून आले असले तरी ते अधिक ठळकपणे पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी दिसून येणार आहेत. मात्र या राजकीय चकमकीकडे राष्ट्रवादीचे बारकाईने लक्ष असून माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचा गट लाभ उठविण्याच्या तयारीत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasahebanchi shivsena mla anil babar counter challenged bjp mla gopichand padalkar print politics news dpj
First published on: 27-01-2023 at 14:07 IST