त्रिपुरा विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने राज्यव्यापी रथयात्रा काढणार असल्याची घोषणा केली आहे. ५ जानेवारीपासून या यात्रेला सुरुवात होणार आहे. भाजपाने या यात्रेला ‘जनविश्वास यात्रा’ असं नाव दिलं आहे. केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भाजपा सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.

या रथयात्रेबाबत अधिक माहिती देताना त्रिपुरा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राजीव भट्टाचार्जी म्हणाले की, या रथयात्रेचा भाग असणारी एक यात्रा दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातून सुरू होईल आणि दुसरी यात्रा उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातून सुरू होईल. दोन्ही यात्रा ५ जानेवारीला सुरू होतील. १२ जानेवारी रोजी आगरतळा येथे दोन्ही रथ एकत्र येतील.

Campaigning by BJP outside the polling station Congress complaint to the Commission
मतदान केंद्राबाहेरच भाजपकडून प्रचार; प्रशासन बघ्याच्या भूमिकेत, काँग्रेसची आयोगाकडे तक्रार
supriya sule marathi news, goa cm pramod sawant marathi news
“सुप्रिया सुळे घरातील वादात अडकल्याने काहीही बोलतात”, गोव्याचे मुख्यमंत्री म्हणाले…
Sudhir Mungantiwar-Kishore Jorgewar reunion Will campaign in the Lok Sabha elections
सुधीर मुनगंटीवार-किशोर जोरगेवार यांचे मनोमिलन; लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार
Kerala bjp campaign
केरळमध्ये तिसरा पर्याय निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न

हेही वाचा- “केंद्र सरकार लष्कराच्या मागे लपत…”, चिनी घुसखोरीवरून राहुल गांधींचं टीकास्त्र; म्हणाले…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे त्रिपुरा दौऱ्यावर येणार आहेत. ते दोन्ही यात्रांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसेच १२ जानेवारी रोजी अमित शाह भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह आगरतळा येथील मेळाव्यातही उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा- “…तर भाजपाला निवडणूक जिंकणे अवघड,” सक्षम पर्याय हवा म्हणत राहुल गांधींचे विरोधकांना आवाहन म्हणाले…

त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा, माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, प्रतिमा भौमिक आणि सर्बानंद सोनोवाल यांच्यासह दहा नेत्यांनी या रथयात्रेत ‘स्टार प्रचारक’ म्हणून सामील व्हावं, असं भाजपाच्या राज्य समितीने प्रस्तावित केलं आहे.