आगामी लोकसभेची निवडणूक लक्षात घेता भाजपामध्ये महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाने बिहारमध्ये कुशवाहा ओबीसी समाजाचे नेते सम्राट चौधरी यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. याआधी ही जाॉबाबदारी पश्चिम चंपारणचे खासदार डॉ. संजय जैस्वाल यांच्याकडे होती. त्यांनी ही जबाबदारी तीन वर्षे सांभाळली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Rajasthan Politics: ब्राह्मण चेहऱ्यावर भाजपाचा विश्वास; पुनिया यांच्या जागी चंद्र प्रकाश जोशींची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

मतांची टक्केवारी वाढण्याची, भाजपाला आशा

सम्राट चौधरी विधान परिषदेत आमदार आहेत. त्यांच्याकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदही आहे. ते कुशवाह ओबीसी समाजातील महत्त्वाचे नेते असून आगामी निवडणुकीत या निर्णयाचा फायदा होईल, अशी भाजपाला अपेक्षा आहे. बिहारमधील निवडणुकीत ओबीसी कुर्मी-ओऐरी समाज मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. मात्र चौधरी यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यामुळे ही मतं आपल्याकडे वळतील, अशी भाजपाला अपेक्षा आहे. उपेंद्र कुशवाह यांनी जेडीयू पक्षाला नुकतीच सोडचिठ्ठी दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत ते भाजपाशी युती करण्याची शक्यता आहे. नवनिर्वाचित सम्राट चौधरी जेडीयू पक्षात अशीच फूट पाडतील आणि मतांचे विभाजन होईल, अशी अपेक्षा भाजपाला आहे.

हेही वाचा >>> Karnataka Election 2023 : आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक, राजभवनावर काढणार मोर्चा!

चौधरी यांनी भाजपाची बाजू भक्कमपणे सांभाळलेली आहे

सम्राट चौधरी हे बिहार भाजपामधील एक महत्त्वाचे नेते आहेत. ते नितीशकुमार यांच्यावर कायम टीका करत असतात. नितीशकुमार यांचा सामना करताना चौधरी यांनी भाजपाची बाजू भक्कमपणे सांभाळलेली आहे. भाजपा आणि जेडीयू सत्तेत असतानाही सम्राट चौधरी यांनी नितीशकुमार यांच्या प्रशासनातील त्रुटींवर बोट ठेवलेले आहे. याच कारणामुळे सम्राट चौधरी नितीशकुमार यांचा भक्कमपणे सामना करू शकतील, असे भाजपाला वाटते.

हेही वाचा >>> आधी काँग्रेसचा विरोध, आता काँग्रेसमध्येच प्रवेश; भाजपा आयटी सेल संयोजकाने मोदी-शहांवर केले होते गंभीर आरोप

चौधरी यांच्याकडे जबाबदारी सोपवताना भाजपाला करावी लागली कसरत

सम्राट चौधरी अगोदर आरजेडी आणि जेडीयू पक्षात होते. त्यामुळे त्यांच्यावर ‘बाहेरचा नेता’ असा टॅग लागलेला आहे. याच कारणामुळे त्यांच्याकडे बिहार भाजपाचे अध्यक्षपद देताना भाजपाला चांगलीच कसरत करावी लागली. चौधरी यांचे वडील शकुनी चौधरी ते राजद पक्षात होते. त्यांनी कायम भाजपाचा विरोध केला. यामुळेही सम्राट चौधरी यांना भाजपामधून काही प्रमाणात विरोध होत होता.

हेही वाचा >>> राहुल गांधींना न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर विरोधक आक्रमक, म्हणाले “आम्ही दडपशाहीसमोर…”

मात्र हे सर्व अडथळे पार करून तसेच नेत्यांची नाराजी दूर करून भाजपाने सम्राट चौधरी यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे चौधरी यांना ही जबाबदारी पेलणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp appoints samrat choudhary as bihar president and general election prd
First published on: 23-03-2023 at 20:26 IST