गुजरात विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अवघे १० दिवस उरले आहेत. एक डिसेंबर रोजी गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने जोरदार ‘फिल्डिंग’ लावली आहे. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह विविध केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय नेते मैदानात उतरले आहेत. शुक्रवारी ८९ पैकी ४० मतदारसंघांत भाजपाच्या बड्या नेत्यांकडून प्रचार करण्यात आला.

भाजपाच्या जवळपास १५ राष्ट्रीय नेत्यांसह राज्यातील काही नेत्यांनी शुक्रवारी ४० हून अधिक जाहीर सभांना संबोधित केलं. यामध्ये भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (उत्तर प्रदेश), हिमंता बिस्वा सरमा (आसाम) आणि शिवराज सिंह चौहान (मध्य प्रदेश), भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या आणि लडाखचे भाजपा खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल आदि नेत्यांचा समावेश होता.

Mahavikas Aghadi, Bhiwandi
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडखोरीची चिन्हे, मतदारसंघात पहिल्याच दिवशी ५४ अर्जांचे वितरण
vehicles, Palghar,
पालघर लोकसभा निवडणुकीसाठी साडेआठशेहून अधिक वाहने, परिवहन विभागाकडून तपासणी सुरू
chandrapur lok-sabha-constituency-review-2024 challenge for Sudhir Mungantiwar
मतदारसंघाचा आढावा : चंद्रपूर- काँग्रेसच्या ताब्यातील मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार यांची कसोटी
Dharashiv Lok Sabha
हाती घड्याळ बांधलेल्या उमेदवारालाच ‘घड्याळा’ची वाढ नकोशी

हेही वाचा- राहुल गांधी पंतप्रधान होईपर्यंत अनवाणी… भारत जोडो यात्रेकरू दिनेश शर्मांची पायपीट…

या प्रचाराला “कार्पेट बॉम्बिंग” असं म्हटलं असून, कोणत्या नेत्यानं कोणत्या भागात प्रचार करायचा, याबाबत विचारपूर्वक नियोजन केल्याची माहिती भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली. संबंधित भाजपा नेत्यानं सांगितलं की, “२०१२ पासून आम्ही विविध राज्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या राष्ट्रीय नेत्यांना निवडणूक असलेल्या राज्यात प्रचारासाठी आणण्याची रणनीती लागू केली आहे.”

हेही वाचा- “राहुल गांधी गुजरातविरोधी”, ‘भारत जोडो’ यात्रेत मेधा पाटकरांच्या सहभागानंतर भाजपाचा हल्लाबोल

संबंधित नेत्यानं पुढे सांगितलं की, “जर योगी आदित्यनाथ हे गुजरातमध्ये आले आणि त्यांनी लोकांना संबोधित करताना म्हटलं की, तुम्ही फक्त भाजपा सरकारमध्ये सुरक्षित राहू शकता इतर कोणत्याही पक्षात तुम्ही असुरक्षित आहात. तर याचा मतदारांवर मोठा प्रभाव पडतो. त्याचप्रमाणे, ज्याठिकाणी बिगर गुजराती लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्याठिकाणी जे पी नड्डा यांच्यासारख्या नेत्यांना घेऊन जाणं, ही आमची मते मिळवण्याची प्रभावी रणनीती आहे. मुखमंत्री सरमा यांचाही गुजरातमध्ये खास चाहता वर्ग आहे.”