भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारने पाकिस्तानबरोबर पुन्हा व्यापार सुरू करण्याची मागणी केल्यानंतर भाजप आणि काँग्रेसने बुधवारी आम आदमी पक्षावर जोरदार टीका केली आहे. आप सरकारने यासंदर्भातील मागणी केल्याचे वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिले होते. त्यानंतर दोन्ही पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

हेही वाचा – राहुल गांधींच्या भारत जोडोपूर्वी ‘या’ पाच पदयात्रांनी घडवली राजकीय क्रांती

‘द इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानंतर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांना आम आदमी पक्षावर पाकिस्तान समर्थीत पक्ष असल्याचा आरोप केला आहे. ‘आप’चे पाकिस्तान प्रेम काँग्रेससारखे आहे. सर्जीकल स्ट्राईकच्यावेळी काँग्रेसनेही प्रश्न विचारले होते. बालाकोट हल्ल्याचे पुरावे मागितले होते. एकीकडे केजरीवाल हे स्वत:ला देशभक्त असल्याचे सांगतात. मात्र, ते देशभक्त नसून वोटबॅंक भक्त आहेत. हिंदुंना शिव्या देणे आणि पाकिस्तानाचे गोडवे गाणारी ‘आप’ काँग्रेसचेच दुसरे रुप असल्याचे पुनावाला यांना म्हटले आहे.

काँग्रेसनेही यामुद्द्यावरून आप सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी पंजाब सरकारच्या या मागणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, जोपर्यत दोन्ही देशातील उच्चस्तरीय अधिकारी याबाबत बोलत नाहीत, तोपर्यंत व्यापार कसा शक्य आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

दिल्ली भाजपाचे नेते मंजींदर सिंह सिरसा यांनीही पंजाब सरकारच्या मागणीवरून भगवंत मान यांना खडे बोल सुनावले आहे. जो पाकिस्तान अंमली पदार्थांचे व्यसन लावून पंजाबच्या युवकांचे आयुष्य खराब करण्याचा प्रयत्न करतो, अशा देशाबरोबर व्यापार सुरू करण्याची मागणी करणे, याचा अर्थ पंजाब सरकारमध्ये केजरीवाला यांचा किती हस्तक्षेप आहे, हे दिसून येते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानने ७ ऑगस्ट २०१९ रोजी भारताबरोबर असलेला व्यापार स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पंजाबमधील शेतकऱ्यांच्या हितासाठी पाकिस्तान बरोबरचा व्यापार सुरू व्हावा, अशी मागणी पंजाबचे मंत्री कुलदीप सिंह धालीवार यांनी केली होती.