छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांना एक वर्षापेक्षा कमी कालावधी बाकी आहे. त्यापूर्वी भाजपने “काँग्रेस हटाओ, छत्तीसगड बचाओ” मोहिमेच सुरू केली आहे. यापार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपाने दुर्ग येथील सभा आयोजित केली होती. यावेळी भाजपा आमदार अजय चंद्रकार यांच्यावर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीच्या घटनेनंतर अजय चंद्रकार बुधवारी जाहीर सभेत चक्क क्रिकेटचे हेल्मेट घालून आल्याचे बघायला मिळालं. दगडफेकीच्या घटनेचा प्रतिकात्मक निषेध करण्यासाठी मी हेल्मेट घालून आलो आहे, असे ते म्हणाले. तसेच दगडफेकीच्या घटनेला छत्तीसगढमधील काँग्रेस सरकारवर जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा – राज्यसभेतील गोंधळात सभापती-विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक

nagpur woman filed rape charges against future husband
तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच……
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
dawood ibrahim marathi news, extortion dawood ibrahim marathi news
खंडणीप्रकरणातून दाऊदच्या पुतण्यासह तिघांची निर्दोष सुटका

काय म्हणाले अजय चंद्रकार?

“राज्यातील पोलीस जनतेची सुरक्षा सोडून वीवीआयपींच्या सुरक्षेसाठी तैनात आहे. तर काही पोलीस राजकाणाऱ्यांच्या कुत्र्यांची काळजी घेत आहेत.छत्तीगढमध्ये कायदा सुव्यवस्थेची वाईट परिस्थिती आहे. काल माझ्यावर दगडफेक करण्यात आली होती. जर माझ्या सारख्या माजी मंत्र्यांवर दगडफेक होत असेल, तर सर्वसामान्याची काय परिस्थिती असेल, याची कल्पना न केलेलीच बरी”, अशी टीका अजय चंद्रकार यांनी छत्तीसगढ सरकारवर केली. तसेच दगडफेकीच्या घटनेला काँग्रेसला जबाबदार धरत काँग्रेस गुंडांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “आज मी हेल्मेट घालून काँग्रेसचा सरकारचा विरोध करतो आहे. मात्र, यापुढे मी कोणतेही सुरक्षा उपकरण वापरणार नाही. माझ्यावर गोळीबार झाला तरी मी छातीवर गोळ्या झेलण्यासाठी तयार आहे”, असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्यावरही टीकास्र सोडले. स्वातंत्र लढ्यात भाजपाच्या नेत्यांचं योगदान काय? त्यांच्या घरचा कुत्रातरी स्वातंत्र लढ्यात शहीद झाला होता का? अशी टीका खरगे यांनी केली होती. त्यालाही अजय चंद्रकार यांनी प्रत्युत्तर दिलं. “स्वातंत्र लढ्यात आमचे योगदान विचारण्यापेक्षा लाला लाजपत राय सोडून काँग्रेसचा एकतरी नेता स्वातंत्र्यासाठी शहीद झाला का? हे आधी खरगेंनी सांगावं”, असे ते म्हणाले. तसेच “कोणाला कुत्रं म्हणजे आमची संस्कृती नाही. मात्र, ही नेहरू गांधी घराण्याची संस्कृती असू शकते”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याला व कार्यकर्त्याला पदयात्रेत चालणं अनिवार्य”, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे निर्देश

दरम्यान, भाजपाच्या या आरोपाला काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिलं आहे. दुर्ग येथील दगडफेक भाजपाच्या कार्यकर्त्यांनीच केली असून पोलीस या घटनेचा तपास आहे करत आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते सुशील आनंद शुक्ला यांनी दिली. तसेच दुसऱ्यांवर आरोप करण्यापेा भाजपाने आधी आपल्या पक्षाचा इतिहास बघावा, असेही ते म्हणाले.