महेश सरलष्कर

राज्यसभेत सभापती जगदीप धनखड यांनी चीनच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी फेटाळल्यामुळे विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गुरुवारी सभापतींच्या समोरील हौदात येऊन घोषणाबाजी केली. आसनावर बसण्याची वारंवार धनखडांनी केलेली विनंती सदस्यांनी धुडकावली. सदस्यांच्या या बेशिस्त वर्तनावर धनखडांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर सभापती आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.

MP Sanjay Singh says it is time to say goodbye to BJP
खासदार संजयसिंग म्हणतात, ‘भाजपला निरोप देण्याची वेळ’
पिंपरी : मावळमध्ये विरोधात काम करणाऱ्या नेत्यांवर होणार कारवाई; भाजप नेत्याचा इशारा
sharad pawar
धमक्यांना घाबरू नका, ‘त्यांना’ दुरुस्त करण्याची वेळ; शरद पवार यांचे अजित पवारांना थेट आव्हान
Rajinder Pal Kaur
“भाजपात सहभागी होण्यासाठी ५ कोटींची ऑफर”, आप आमदाराची पोलिसात तक्रार; गुन्हा दाखल

विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे धनखडांना म्हणाले, ‘आम्ही तुमच्या विरोधात नाही, तुम्हाला खजील करण्याचाही आमचा हेतू नाही. चीनचा मुद्दा महत्त्वाचा असल्याने सदस्य चर्चेची आक्रमक मागणी करत आहेत. पण, तुम्हाला राग येतोय, तुम्ही रागवू नका’. खरगेंना मध्येच थांबवत धनखड म्हणाले, ‘खरगे मला कधीच राग येत नाही. मी ४० वर्षे वकिली केली आहे! मी विरोधकांच्या वर्तनाने हताश झालो आहे’… त्यावर खरगेंनी, ‘ठीक आहे, तुम्ही रागवला नाहीत, तुम्ही हताश झाला आहात’, असे म्हणत चर्चेचा आग्रह धरला.

हेही वाचा: रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांत शिवसेना-राणे यांनी आपापले गड राखले

धनखड यांनी, हौदात येणाऱ्या विरोधी पक्षांच्या सदस्यांना आसनावर जाण्यास सांगावे, अशी खरगेंना विनंती केली. त्यानंतर खरगे बोलण्यासाठी उभे राहिले. त्यांनी धनखडांचे आभार मानले. तर, धनखड म्हणाले, आभार मानू नका, तुमच्या सदस्यांना सहकार्य करायला सांगा!… काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल अत्यंत आक्रमक झाले. ‘अधिवेशनच्या पहिल्या दिवसापासून चर्चेची मागणी करत आहोत पण, तुम्ही मान्य करत नाही’, असे वेणुगोपाल म्हणाले. काँग्रेसचे अन्य खासदार हौदात येऊन चर्चा झालीच पाहिजे, अशा घोषणा देत होते. या गोंधळात धनखडांनी शून्य प्रहराचे कामकाज सुरू केल्यामुळे वेणुगोपाल आक्षेप घेत म्हणाले, कामकाजासाठी सभागृह ‘ऑर्डर’मध्ये नाही’. त्यावर,‘सभागृह ऑर्डर नाही कारण तुम्ही डिसऑर्डर आहात… तुम्ही तुमच्या वर्तनाची चित्रफीत नंतर पाहा, तुमच्या कुटंबियांनाही दाखवा. तुमचे वर्तन तुम्हाला आयुष्यभर सतावत राहील, अशी टिप्पणी धनखडांनी विरोधी सदस्यांवर केली.

‘तुम्ही सगळे अनुभवी सदस्य असूनही गोंधळ घालत आहात. तुमच्याविरोधात मला कारवाई करण्यास लावू नका, एकदा मी निर्णय घेतला तर फेरविचार करणार नाही… गेल्या २० वर्षांमध्ये क्वचितच नियम २६७ अंतर्गत चर्चा झालेली आहे’, अशा किंचित चढ्या आवाजात धनखड सदस्यांना समजावत होते.सभागृहातील गोंधळ बघून धनखड यांनी सभागृह नेते पीयुष गोयल आणि विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना दालनात येऊन भेटण्यास सांगितले.

हेही वाचा: कोल्हापुरात महाविकास आघाडीचा झेंडा; भाजपचेही यश उल्लेखनीय

त्यावर, ‘दालनात कशाला चर्चा करायची? सभागृहात चर्चा झाली तर चिनी घुसखोरीची माहिती लोकांना कळेल. सीमेवर चीनने पूल बांधले आहेत, वसाहती उभ्या केल्या आहेत, त्यावर चर्चा करण्याची गरज आहे’, असे खरगे म्हणाले. ‘आम्ही विरोधक देशाच्या लष्कराच्या मागे उभे आहोत, जवानांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. भाजपपेक्षा आम्ही देशप्रेमी आहोत’, असा युक्तिवाद खरगेंनी केला. खरगेंनी, ‘तुम्ही सतत नियम दाखवत आहात’, असे म्हणतातच, ‘तुम्हाला नियम सांगणार नाही तर कोणाला सांगणार’, असे म्हणत धनखड यांनी विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण, चर्चेची विनंती फेटाळल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त सभात्याग केला.