संतोष प्रधान

मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप या पुणे जिल्ह्यातील भाजपच्या दोन आमदारांच्या लागोपाठ मृत्यूमुळे रिक्त झालेल्या या दोन्ही जागा कायम राखण्याचे भाजपपुढे आव्हान उभे ठाकले आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यापासून आतापर्यंत सहा विद्यमान आमदारांचा मृत्यू झाला. टिळक आणि जगताप या दोन आमदारांचा दोन आठवड्यांच्या अंतराने मृत्यू झाला. पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन मतदारसंघातील जागा रिक्त झाल्या आहेत. यापैकी कसबा मतदारसंघातील पोटनिवडणूक लढविणार नाही, असे राष्ट्रवादीने जाहीर केले आहे. लक्ष्मण जगताप हे पूर्वी राष्ट्रवादीचेच आमदार होते. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

supreme court rejected plea of dhangar community
धनगर आरक्षण याचिका फेटाळली; आदिवासींचा दर्जा देण्याच्या मागणीस न्यायालयाचा नकार
Congress accuses the government that more and more families are in debt
अर्थव्यवस्थेची परिस्थिती बिकट! अधिकाधिक कुटुंबे कर्जाच्या विळख्यात सापडल्यचा काँग्रेसचा सरकारवर आरोप
eknath shinde
मित्रपक्षांकडून युती धर्माचे पालन नाही; शिंदे गटाच्या आमदारांकडून नाराजी; ठाणे, पालघर पक्षाकडेच ठेवण्यासाठी आग्रह
Government decision not to increase read reckoner for elections
रेडीरेकनर वाढीला निवडणुकीची वेसण; घरांच्या किमती घटणार? रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीवर काय परिणाम?

हेही वाचा… राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांना शह देण्यासाठीच सांगली बँकेची चौकशी? भाजपच्या स्थानिक नेत्यांमागे ससेमिरा

दोन जागा रिक्त झाल्याने शिंदे-फडण‌वीस सरकारच्या स्थिरतेवर परिणाम होणार नाही. पण पोटनिवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागल्यास ते भाजपला राजकीयदृष्ट्या अडचणीचे ठरू शकते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांची सत्ता कायम राखण्यावर भाजपने सारा भर दिला आहे. राज्यात सत्ताबदल झाल्याने या दोन्ही महानगरपालिका ताब्यात धेण्याच्या राष्ट्रवादीच्या योजनेवर पाणी फिरले. तरीही पिंपरी-चिंचवडमध्ये आव्हान देण्याची अजित पवार यांनी तयारी सुरू केली आहे.

हेही वाचा… चंद्रपूर मतदारसंघ पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपची मोहिम; मुनगंटीवार की अहिर ?

नुकत्याच झालेल्या अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतली होती. याच धर्तीवर कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघांतील पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात, असा भाजपचा प्रयत्न असेल. याआधी झालेल्या पंढरपूर, कोल्हापूर उत्तर, देगलूर या मतदारसंधांतील पोटनिवडणुका मात्र चुरशीच्या झाल्या होत्या. दोन्ही बाजूने सारी ताकद पणाला लावण्यात आली होती. अंधेरीत भाजपच्या माघारीमुळे आता कसबा पेठ आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसला फारसे ताणता येणार नाही.