देशात २०२४ साली लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीत भाजपा विरुद्ध काँग्रेस यांच्यात सामना रंगणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने ‘भारत जोडो यात्रा’ सुरु केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर असा या यात्रेचा प्रवास असणार आहे. ही यात्रा १२ राज्यातून जात ३,५७० किलोमीटरचा प्रवास करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या तामिळानाडू, केरळ, कर्नाटक या राज्यातून प्रवास करत ‘भारत जोडो यात्रे’ने आंध्रप्रदेश राज्यात प्रवेश केला आहे. ३८ व्या दिवशी या पदयात्रेने १००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. यात्रेच्या दरम्यान राहुल गांधी तेथील नागरिकांशी संवाद साधून तेथील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

पायी यात्रेत राहुल गांधींचे लहान मुले, तरुण आणि वयोवृद्धांबरोबरचे अनेक फोटो समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाले आहेत. तसेच, राहुल गांधींच्या फिटनेसचही चर्चा करण्यात येते. राहुल गांधी कधी यात्रेत धावताना दिसतात, तर कधी मुलांना खांद्यावर घेऊन चालतात. यात्रेत असलेल्या काहींनी सांगितलं की, चालताना राहुल गांधींशी बरोबरी करता येत नाही.

हेही वाचा : सौरभ गांगुलीच्या गच्छन्तीनं ममता बॅनर्जींना बसला धक्का; पंतप्रधान मोदींकडे करणार ‘ही’ मागणी

त्यात काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यामध्ये ते एका लहान मुलासह रोडवरती पुश-अप्स काढताना दिसत होते. त्यांच्यासह कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार, पक्षाचे सचिव के. सी वेणुगोपालही होते. त्यानंतर अनेक प्रतिक्रियाही उमटल्या होत्या.

यावर डी. के. शिवकुमार म्हणाले की, “राहुल गांधी खूप तंदुरुस्त आहेत. मी ६० वर्षाचा आहे, पण त्यांच्यासारखी शरीराची देखभाल केली नाही. मला राहुल गांधींसारखं तंदुरुस्त राहायचे आहे. तरुणांनाही ते आवडते.”

हेही वाचा : राजस्थानच्या मंत्र्याने केली राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेची प्रभू श्रीरामाच्या पदयात्रेशी तुलना, म्हणाले…

काँग्रेस युवक संघटनेचे कार्यकर्ते ध्रुव जट्टी यांनी म्हटलं, “राहुल गांधींची तंदुरुस्त हा यात्रेचा गाभा होता. राहुल गांधी सकाळी सहा वाजता उठतात. दिवसातून २५ किलोमीटर पायी प्रवास करतात.”

तर, कर्नाटक काँग्रेसच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितलं, “भारत जोडो यात्रेदरम्यान आम्ही १० ते १५ दिवसांत चालून थकलो. मात्र, राहुल गांधी यांची तंदुरुस्ती अतुलनीय आहे. राहुल गांधींना चालताना पाहून तरुणांमध्ये नवचैतन्य आलं आहे.”

हेही वाचा : सौरव गांगुलीने भाजपात प्रवेश न केल्यामुळेच अध्यक्षपदाची ‘विकेट’; तृणमूल, काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाची टीका

‘भारत जोडो यात्रे’ने मंगळवारी ( १८ ऑक्टोंबर ) आंध्रप्रदेश राज्यात प्रवेश केला आहे. राहुल गांधी आंध्रप्रदेशच्या सीमेवर पोहचताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष साके शैलजानाथ आणि अन्य नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. आंध्रप्रदेशमध्ये ही यात्रा अलुरु, हट्टी, बेलागल आणि मुनिकुर्ती येथून जात अदोनी गावात विश्रांती करेल. २१ ऑक्टोबरला ही यात्रा पुन्हा सुरु होईल. त्यानंतर तेलंगणाला जाताना यात्रा पुन्हा कर्नाटक राज्यात प्रवेश करेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader rahul gandhi fitness bharat jodo yatra ssa
First published on: 18-10-2022 at 20:58 IST