महेश सरलष्कर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘भारत जोडो’ यात्रेतील काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या विधानावरून राज्यसभेत मंगळवारी शून्य प्रहरात रणकंदन माजले. खरगेंनी सभागृहाचा, देशाचा, मतदारांचा अपमान केला असून त्यांनी तातडीने माफी मागितली पाहिजे, अशी जोरदार मागणी करत सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी काँग्रेसवर शाब्दिक हल्लाबोल केला. पण, ‘स्वातंत्र्य लढ्याच्या काळात माफी मागणारे आम्हाला माफी मागायला सांगत आहेत’, असे तितकेच आक्रमक प्रत्युत्तर खरगेंनी दिले. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या सदस्यांमध्ये बाचाबाची झाली.

राजस्थानमध्ये ‘भारत जोडो’ यात्रेत सोमवारी अलवार येथील जाहीरसभेत खरगेंनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपवर कडाडून टीका केली. स्वातंत्र्य लढ्यात संघाचा सहभाग नव्हता. त्यांच्यापैकी कोणीही या लढ्यात बलिदान दिले नाही. त्यांच्या घरातील कुत्र्याने तरी देशासाठी प्राण गमावले होते का?… तरीही, संघ-भाजप स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणवून घेत आहे. पण, आम्ही (काँग्रेस) त्यांच्यावर टीका केली तर आम्हाला हेही वाचा: राजकीय नेत्यांच्या फलकांमुळे उपराजधानीचे विद्रुपीकरण; प्रमुख ठिकाणी फलक लावण्यासाठी प्रशासनावर दबावदेशद्रोही ठरवले जाते, असे खरगे भाषणात म्हणाले होते.

हेही वाचा: राजकीय नेत्यांच्या फलकांमुळे उपराजधानीचे विद्रुपीकरण; प्रमुख ठिकाणी फलक लावण्यासाठी प्रशासनावर दबाव

खरगे यांच्या या विधानावर राज्यसभेतील गटनेते पीयुष गोयल यांनी आक्षेप घेतला. ‘खरगेंचे विधान अत्यंत आक्षेपार्ह असून त्यांनी माफी मागितली पाहिजे. काँग्रेसच्या पक्षाध्यक्षांना जाहीरसभेत कसे बोलावे हेदेखील कळत नाही. एखाद्या मुद्द्यावर मतभेद असू शकतात. पण, हे विधान म्हणजे भाजपच्या यशाबद्दल काँग्रेसची असूया दर्शवते. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जेमतेम ५० जागा मिळाल्या, भाजपला ३०३ जागांचे प्रचंड बहुमत मिळाले. काँग्रेसला आता कोणी वाली नाही. महात्मा गांधींनी काँग्रेसचे विसर्जन करण्याची सूचना केली होती. त्यांची ही सूचना किती योग्य होती हे खरगेंवरून दिसते. खरगेंनी माफी मागावी अन्यथा विरोधी पक्षपदावर राहू नये, असे गोयल सभागृहात म्हणाले. गोयल यांच्या आक्षेपानंतर दोन्हीबाजूंकडील सदस्यांनी जबरदस्त गदारोळ केला.

गोयल यांच्या विधानावर खरगेंनी आणखी आक्रमक होत सत्तधारी पक्षाच्या सदस्यांना प्रत्युत्तर दिले. ‘मी भाषणात बोललो, तेच पुन्हा सभागृहात बोललो तर तुमची फारच पंचाईत होईल. स्वातंत्र्य लढ्याच्या काळात तुम्ही माफी मागितली. तुम्ही स्वातंत्र्य लढ्यात कधीही नव्हता. आता तुम्ही मला माफी मागायला सांगत आहात. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी प्राण गमावले. तुमच्यापैकी कोणी देशासाठी बलिदान दिले? देशाला एकत्र ठेवण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले. तुम्ही काय केले?’, अशी प्रश्नांची सरबत्ती खरगेंनी केली.
सभागृहाबाहेर केलेल्या विधानावर इथे चर्चा होऊ शकत नाही, असे स्पष्ट करत खरगेंनी भाजपची माफीची मागणी धुडकावून लावली. खरगेंचा मुद्दा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी मान्य केला. तरीही, पीयुष गोयल यांनी, काँग्रेसच्या धोरणांमुळे देशाचे नुकसान झाल्याचा मुद्दा रेटला. ‘काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरची समस्या निर्माण झाली. काँग्रेसच्या काळात चीनने ३८ हजार चौरस किमी भूभाग बळकावला’, असे गोयल म्हणाले.

हेही वाचा: शिवसेना-वंचित युती : परिवर्तनाची नांदी

मंत्र्यांच्या परवानगीची गरज नाही!

या सगळ्या गोंधळात चीनच्या मुद्द्यावर मंगळवारी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी दिलेल्या ६ नोटिसा धनखड यांनी फेटाळल्या. आक्षेपाचे मुद्दे मांडण्यास परवानगी न दिल्याने विरोधकांनी सभात्याग केला. समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव यांनी दिलेली नोटीस फेटाळताना धनखड यांनी नोटिसीमधील मजकुरावर नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा: शेखर माने : सामाजिक भान असलेला कार्यकर्ता

सभागृहाचे कामकाज स्थगित करून गंभीर मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी नियम २६७ अंतर्गत नोटीस देता येते. यादव यांनी, मंत्र्यांनी परवानगी दिली तरच या नियमांतर्गत चर्चा केली जाऊ शकते, असे म्हटल्याचा उल्लेख धनखड यांनी केला. हे विधान योग्य नसून सभागृहात चर्चा घेण्यासाठी कोणा मंत्र्यांच्या परवानगीची गरज नाही. या सभागृहात मी निर्णय घेत असतो. मला योग्य वाटले तर मी दररोज २६७ अंतर्गत चर्चा घेईन, असे धनखड म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress president mallikarjun hharge criticized rss and bjp at public meeting alwar during the bharat jodo yatra rajasthan parliament piyush goyal print politics news tmb 01
First published on: 20-12-2022 at 15:24 IST