‘बीबीसी’ने नुकताच गुजरात दंगलीबाबत एक माहितीपट प्रदर्शित केला आहे. ‘इंडिया: द मोदी क्वेशन’ नावाच्या या माहितीपटातून गुजरात दंगलींमध्ये तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. दरम्यान, या माहितीपटावर केंद्र सरकारने बंदी आणल्याने काँग्रेससह विरोधीपक्षांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. काँग्रेस आणि सीपीआयने केरळमध्ये विविध ठिकाणी या माहितीपटाचे स्क्रिनिंग केलं आहे.

हेही वाचा – “लष्कराला पुरावे देण्याची गरज नाही”, राहुल गांधींचा दिग्विजय सिंहांना घरचा आहेर; म्हणाले, “सर्जिकल स्ट्राईकबाबत…”

मंगळवारी सीपीआय(एम) कडून तिरुअनंतपुरममधील पूजापपुरा येथे गुजरात दंगलरीवरील माहितीपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले होते. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी पोहोचत सीपीआय(एम)चा विरोध करण्यासा सुरूवात केली. यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकांना धक्काबुक्की देखील करण्यात आली. मात्र, पोलिसांनी घटानस्थळी दाखल होत. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्तांना शांत केले. यावेळी महिला आणि भाजपाचे काही कारकर्ते जखमी झाले. याशिवाय सीपीआय(एम)ने पलक्कड, कोझिकोड आणि वायनाडमधील कलपेट्टा येथेही या माहितीपटाचे स्क्रिनिंग केलं.

हेही वाचा – BBC Documentary : केंद्र सरकारकडून बंदी, तरीही विरोधकांकडून केला जातोय शेअर; बीबीसीच्या माहितीपटावरून राजकारण तापलं!

दरम्यान यासंदर्भात बोलताना सीपीआय(एम)चे राज्य सचिव एमव्ही गोविंदन म्हणाले, बीबीसीच्या माहितीपटावर बंदी घालणं हे लोकशाही विरोधी आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात सर्वच स्तरावरून आवाज उठवणे आवश्यक आहे. तर बीबीसीच्या माहितीपटावर बंदी घालणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचे उल्लंघन असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी दिली.

हेही वाचा – “नेताजी सुभाषचंद्र बोस आज असते तर मोदी सरकारने त्यांचा सन्मान मुळीच….”अनिता बोस यांची स्पष्टोक्ती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष म्हणजे, सीपीआय(एम) आणि काँग्रेसकडून या केंद्र सरकारच्या बंदीच्या निर्णयाला विरोध होत असला, तरी काँग्रेस वरिष्ठ नेते एके अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांनी या बंदीच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. भाजपाशी आमचे वैचारिक मतभेद आहेत. मात्र, तरीही मला वाटतं की या माहितीपटामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होऊ शकतो, असं ते म्हणाले. तसेच जे लोकं बीबीसी आणि ब्रिटनचे माजी परराष्ट्र सचिव जॅक स्ट्रॉ यांचं समर्थन करत आहेत, ते लोक चुकीचा पायंडा पाडत अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. त्यामुळे आगामी काळात यावरून पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहे.