सुनेला उमेदवारी देण्यावरून देवेगौडा कुटुंबात झालेल्या वादामुळे धर्मनिरपेक्ष जनता दलातील घराणेशाही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘गरीब नम्र शेतकरी’ अशी उपमा देण्यात येणाऱ्या देवेगौडा यांचा जनता पक्ष म्हणजे खासगी कंपनी आहे की काय, अशी शंका घेतली जाते. कारण देवेदौडा कुटुंबातील तब्बल सात जण निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय आहेत वा विविध पदे भूषवित आहेत.

हसन हा देवेगौडा यांचा बालेकिल्ला मानला जातो. हसन मतदारसंघातील उमेदवारीवरून देवेगौडा कुटुंबात तीव्र संघर्ष झाला. देवेगौडा यांची दोन्ही मुले कुमारस्वामी आणि रेवण्णा हे राजकारणात सक्रिय आहेत. दोघांच्या बायका तसेच मुलेही विविध पदांवर आहेत. रेवण्णा यांची पत्नी भवानी यांना हसनमधून उमेदवारी हवी होती. पण कुमारस्वामी यांनी भावाच्या बायकोला उमेदवारी देण्यास विरोध केला. हसनच्या जागेवरून देवेगौडा कुटुंबात दोन आठवडे काथ्याकूट सुरू होता. देवेगौडा यांनी दोन्ही मुले, त्यांची पत्नी व नातवंडांना एकत्र आणून वादावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. पण रेवण्णा यांच्या मुलाने आम्हाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यावरून देवेगौडा कुटुंबातील कलहावर तर्तू पडदा पडदा असला तरी निवडणुकीत दोन्ही भाऊ परस्परांवर कुरघोडी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा – मराठा समाजाला ओबीसीअंतर्गतच आरक्षणाचा पर्याय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवेगौडा यांच्या कुटुंंबातील सात जण विविध पदांवर आहेत. स्वत: देवेगौडा हे राज्यसभेचे खासदार आहेत. कुमारस्वामी आणि त्यांचे बंधू रेवण्णा हे आमदार आहेत. दोघेही पुन्हा रिंगणात आहेत. कुमारस्वामी यांची पत्नी अनिता या गेली पाच वर्षे आमदार होत्या. या वेळी त्यांच्या मतदारसंघात कुमारस्वामी यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली आहे. रेवण्णा स्वत: आमदार आहेत. त्यांचा मुलगा खासदार आहेत. उमेदवारी नाकारण्यात आलेल्या रेवण्णा यांच्या पत्नी भवानी या हसन जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. एकाच घरात सात पदे असल्याने जनता दल म्हणजे देवेगौडा यांची खासगी कंपनी, अशी टीका केली जाते.