कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप अंतर्गत कलह आणखीनच वाढत चालला आहे. कोल्हापूर शहर, आजरा, चंदगड तालुक्यानंतर आता गडहिंग्लज, करवीर, शिरोळ या तालुक्यांसह कोल्हापुरातील मतभेद पुढे आले आहेत. पुढील महिन्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असताना अंतर्गत वाद, त्यातून निर्माण झालेली कटुता, मतभेद मिटवणे हे जिल्ह्यातील नेत्यांसमोर आव्हान असणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात भाजप अधिकाधिक रुजावा यासाठी प्रदेश पातळीवरून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी जिल्ह्यात नव्या दमाचे पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यानंतर तालुका पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती जाहीर होताच पक्षातील निष्ठावंत आणि उपरे असा वाद रंगला आहे. पक्षात नव्याने आलेल्यांना पदे आणि निष्ठावंतांना डावलणे जाणे या प्रकारावरून जुन्या कार्यकर्त्यांनी पक्ष आणि पक्षनेते विरोधात संघर्ष पुकारला आहे.

BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
long discussed issue of widening Katraj to Kondhwa road is gradually being resolved
कात्रज कोंढवा रस्त्याबाबत मोठी अपडेट, जागा ताब्यात देण्यासाठी आले इतके प्रस्ताव..!
Two youths die while performing stunts on two wheelers after drinking alcohol
नागपूर : दारु पिऊन दुचाकीने ‘स्टंटबाजी’; दोन युवकांचा मृत्यू
Panvel Municipal Corporation anti encroachment action
पनवेल महापालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई
Three youths killed in car accident on Daryapur Akola road amravati
अमरावती: दोन कार समोरासमोर धडकल्या; तीन युवक ठार, तीन जखमी
Four of a family injured in road accident on pune satara highway
पुणे-सातारा महामार्गावर कंटेनरची मोटारीला धडक; एकाच कुटुंबातील चौघे जखमी, अपघातानंतर वाहतूक विस्कळीत

हेही वाचा – “फडणवीस, गडकरींच्या विकासाच्या पोकळ गप्पा अन् भाजपाचा भ्रष्ट कारभार उघड”, असे का म्हणाले नाना पटोले? वाचा…

गेल्या आठवड्यामध्ये जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे असलेल्या आजरा, चंदगड या दोन तालुक्यांतील भाजप अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला होता. तेथील जुन्या कार्यकर्त्यांनी पक्षाचा फलक उतरवून काम थांबवण्याचा निर्णय घेतला होता. या तालुक्याला लागूनच असलेल्या गडहिंग्लज तालुक्यात असेच पडसाद उमटले आहेत. येथे जुन्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती रद्द केल्या जाव्यात अशी त्यांची मागणी आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ पातळीवरून तालुका पातळीवर कुरघोड्यांचे राजकारण केले जात आहे, ते थांबवले नाही तर भाजपला धोका असल्याचा इशाराही गेले तीन दशके पक्षाचे काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी दिला आहे. या तालुक्यात ७ ऑक्टोंबरला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा आहे. तत्पूर्वी तेथील नाराजी दूर व्हावी यासाठी खासदार धनंजय महाडिक, माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचे प्रयत्न सुरू आहेत. घाटगे यांनी नाराजी दूर करण्यासाठी बैठक घेण्याची तयारी दर्शवली. मात्र नाराजांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या तालुक्यातील वाद कसा मिटवायचा हे एक आव्हान होऊन बसले आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात तक्रारी

भाजपच्या नव्या पदाधिकारी निवडीत शिरोळ तालुक्याकडे राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या रुपाने ग्रामीण जिल्हाध्यक्ष सोपवण्यात आले आहे. भाजपमधील नवे – जुने कार्यकर्ते असा वाद धुमसत आहे. भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे हे वाद मिटवण्यासाठी तालुक्यात गेले. गेल्या तीन वर्षांमध्ये तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे यांनी एकही बैठक घेतले नाही. कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत नाहीत, अशा तक्रारी माजी तालुकाध्यक्ष मुकुंद पुजारी, जयसिंगपूरचे शहराध्यक्ष मिलिंद भिडे आदींनी देशपांडे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत मांडली. देशपांडे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असला तरी कार्यकर्त्यांची नाराजी अजून दूर झालेली नाही. या कार्यकर्त्यांनी थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. या तालुक्यातील वादाला पुन्हा तोंड फुटले आहे.

हेही वाचा – “देवेंद्र फडणवीस सत्तेच्या नशेत की सत्तेने भ्रष्ट?”, ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सवाल; म्हणाले, “इतकी मस्ती…”

करवीरात वाद तापला

कोल्हापूर शहराला लागून असलेल्या करवीर तालुक्यामध्ये भाजपमधील मतभेद उफाळून आले आहेत. भाजपच्या जिल्हा नेतृत्वाबद्दल निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेला काळे झेंडे दाखवणाऱ्याकडे पक्षाने विशेष कार्यकारी अधिकारी पद सोपवले आहे. अशा लोकांबरोबर काम कसे करायचे? असा प्रश्न तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचा निर्णय संभाजी पाटील, डॉ. इंद्रजीत पाटील, शिवाजी बुवा आदींच्या बैठकीत घेण्यात आला. आपल्यावरील अन्यायाबाबतचे निवेदन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्याचे ठरले आहे.

कोल्हापुरात पुन्हा नाराजी

कोल्हापूर शहरातील महानगर अध्यक्ष निवडीवरून वाद मिटतो न मिटतो तोवर भाजपच्या एका बैठकीस काँग्रेसचे माजी नगरसेवक सुभाष रामुगडे हे उपस्थित राहिल्याने जोरदार खडाजंगी उडाली. पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अजित ठाणेकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह खाडे पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या समवेत त्यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीवेळी रामुगडे हे उपस्थित कसे राहू शकतात, असा रोकडा प्रश्न उपस्थित केला. काँग्रेसच्या यात्रेत सहभागी होणारे भाजपच्या बैठकीला उपस्थित राहणार असतील तर आम्ही बैठकीला थांबणार नाही अशी रोखठोक भूमिका त्यांनी घेतली. महाडिक यांनी या बैठकीमधील हा विषय नसल्याचे सांगून भाजपच्या सुकाणू समितीच्या बैठकीत चर्चा करू असे म्हणत वादावर पडदा पाडला असला तरी पक्षातील संघर्ष संपलेला नाही. याच बैठकीत राजारामपुरी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा फलकावर आपले नाव का घातले नाही, अशी विचारणा कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी असणाऱ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने करत एका मंडळ अधिकाऱ्यावर तोंडसुख घेतले. यामुळेही बैठकीतील वातावरण तापले होते. अशा घटनांमुळे कोल्हापूर शहरातील भाजपचा वादही पुन्हा नव्याने पुढे आला आहे.

Story img Loader